Diabetes Health Care: मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते त्यांना साखर किंवा गोड पदार्थ न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण यामुळे तुमची साखरेची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
पण काही लोक मधुमेह असाला तरी साखरेऐवजी गूळ खातात. कारण आपल्यापैकी बरेच जण गुळाला आरोग्यदायी मानतात. साखरेला गूळ हा चांगला पर्याय आहे, पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी तो चांगला आहे का? तुमचाही या विषयाबाबत संभ्रम असेल तर तज्ज्ञांकडून सविस्तरपणे जाणून घेऊया.