मंकीपॉक्सने जगभरात डोके वर काढले. देशातसुद्धा मंकीपॉक्सचे पहिलं प्रकरण 14 जुलैला केरळमध्ये समोर आलं होतं.त्यानंतर नऊ देशाच्या विविध भागात 9 प्रकरणे समोर आले होतते. याशिवाय केरळमध्ये 22 वर्षाच्या एका युवकाचा मृत्यूही मंकीपॉक्समुळेही समोर आलंय. सगळीकडे मंकीपॉक्सने कोहराम केलाय.
पण तुम्हाला माहिती आहे का मंकीपॉक्सबद्दल एक गैरसमज पसरलाय. हो, मंकीपॉक्सबद्दल एक गैरसमज आहे की समलैंगिक (homosexual) पुरुषांना याचा धोका अधिक असतो तर स्त्रियांना मात्र याचं सक्रमण होण्याची शक्यता अधिक असते. पण मंकीपॉक्स एक असा संक्रमित आजार आहे, जो कोणालाही होऊ शकतो.
केवळ समलैंगिकांनाच मंकीपॉक्सचे संक्रमण होत आहेत?
खरं तर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही दिवसांपूर्वी मंकीपॉक्स बद्दल धक्कादायक खुलासा केला होता. त्यांच्या मते पहिला मे महिन्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता तेव्हापासून 98% प्रकरणे असे समोर आले आहे की बायसेक्शुअल आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये मंकीपॉक्स रुग्णांचा समावेश होता.
मंकीपॉक्स या आजाराबद्दल जाणून घ्या
१. मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ संसर्ग रोग आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये याचा प्रथम शोध लागला होता तर मंकीपॉक्सची पहिली मानवी केस 1970 मध्ये नोंदवली गेली होती.
२.मंकीपॉक्स संक्रमित प्राण्याने घेतलेल्या चाव्यामुळे किंवा रक्त किंवा शरीरातील घटकांमुळे पसरते. उंदरांमुळेही हा रोग पसरत असल्याचे मानले जाते. सोबतच नीट शिजवलेले नसलेल्या संक्रमित प्राण्याचे मांस खाल्ल्यानेही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
३. आरोग्य तज्ञांच्या मते,काही संसर्ग लैंगिक संपर्काद्वारेसुद्धा पसरतात.
४. ताप, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे ही मानवांमध्ये मंकीपॉक्सची सामान्य लक्षणे आहेत.
५. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये 40 हून अधिक मंकीपॉक्सची प्रकरणे आढळल्यानंतर कॅनडातही मंकीपॉक्सची प्रकरणे आढळली असून आता स्वीडन आणि इटलीमध्येही मंकीपॉक्स रुग्ण सापडले. कोरोनासारखे अख्या जगावर याचे सावट निर्माण होईल का, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
६. मंकीपॉक्सचा काळ साधारणपणे 6 ते 13 दिवसांचा असतो परंतु डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार तो 5 ते 21 दिवसांपर्यंतही असू शकतो
मंकीपॉक्सची लक्षणे -
शरीरावर गडद लाल पुरळ
असह्य स्नायू वेदना
तीव्र डोकेदुखी
सर्दी
निमोनिया
शारीरिक थकवा जाणवणे
उच्च ताप
शरीरावर सूज
उर्जेची कमतरता जाणवणे
लाल पुरळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.