Diet Mantra: पीसीओडीचा त्रास असेल तर औषधासह आहारातही करा हे ५ बदल

पीसीओडीचा त्रास कमी करायचा असेल तर औषधोपचाराबरोबरच खाण्यापिण्याचीही काही पथ्ये पाळणे गरजेचे ठरते
Diet Mantra
Diet Mantraesakal
Updated on

PCOD: हल्ली महिलांमध्ये पीसीओडीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पीसीओडीची समस्या एकदा निर्माण झाली की ती बरी होत नाही तिला फक्त नियंत्रणात ठेवता येते. मात्र याचा अधिक प्रमाणात होणारा त्रास कमी करता येऊ शकतो. त्यासाठी औषधोपचाराबरोबरच खाण्यापिण्याचीही काही पथ्ये पाळणे गरजेचे ठरते.

तुम्ही खाण्यापिण्याची ही 5 पथ्ये पाळलीत तर त्रास कमी होईल

१) पीसीओडी या समस्येत शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले पदार्थ म्हणजे ज्या पदार्थांमुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही असे पदार्थ. याचाच अर्थ आहारातील तेलकट पदार्थ टाळायला हवेत. त्यासोबतच फास्ट फुड आणि पॅकेज्ड फुड टाळा.

Diet Mantra
Health: महत्वपूर्ण! पाठीचं दुखणं हलक्यात घेऊ नका, असू शकतात कँसरचे लक्षणं

२) ही फळे खावी

फळांमध्ये बेरी फळांचा समावेश करावा. स्ट्रॉबेरी, द्राक्षे, चेरी ही फळे खावी. तसेच आहारात पपईचाही समावेश असावा.

३) पीसीओडी नियंत्रणात ठेवण्यासाठी हेही खा

पीसीओडी नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रोकोली, पालक, मेथी या भाज्या खाव्यात. या भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. पीसीओडीमध्ये वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल.

Diet Mantra
Health: बीयर पिणाऱ्यांचा फायदा तर न पिणाऱ्यांचं नुकसान! तज्ज्ञांचा गजब दावा.. एकदा वाचाच

४) जेवणानंतर तुम्हाला मध्यंतरी भूक लागल्यास बदाम, अक्रोड, पिस्ता हा सुकामेवा खावा. तसेच जवस, चिया सिड्स, सूर्यफुलांच्या बिया खाणे पीसीओडी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तसेच बाहेर जाताना तुमच्याजवळ काही पौष्टिक पदार्थांचा डबा असावा. पण चुकूनही भूक लागल्यास बाहेरचे पदार्थ खाऊ नका.

Diet Mantra
Health : गरोदरपणात कोल्ड्रिंक पिताय, मग हे वाचा

५) पीसीओडीमध्ये मूड जाणे, उदास वाटणे या मानसिक समस्याही निर्माण होतात. मूड ऑफ असल्यास दही घ्या. तसेच गोड खाण्याची इच्छा असल्यास डार्क चॉकलेट खावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.