Diet Plan : वजन कमी करताय,फॉलो करा हा डायट प्लॅन

वजन वाढल्याने आवडते ड्रेस घालता येत नाहीत
Diet Plan
Diet Planesakal
Updated on
Diet Plan
Diet Plan: जेलमधला सुलतान! चक्क दातांनी मोडायचा सळया; 103 वर्षाच्या 'या' वृद्धाची बॉडी म्हणजे...

पुणे : आज प्रत्येकाचा हाच प्रश्न आहे की, वजन कसे कमी करावे. स्त्रियांना याचा अधिक त्रास होतोय. प्रेगन्सीमुळे वात राहतो, पोट किंवा कंबरेवर चरबी लटकते, यामुळे महिलांचे शरीर बोजड बनते. सतत आळस येत राहतो. वजन वाढल्याने आवडते ड्रेस घालता येत नाहीत. स्लीम असलेल्या तरूणी तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी पोषक आहार आणि व्यायाम महत्त्वाचा असतो. त्यासाठी तुम्ही किमान 1 तास चालले पाहिजे. तसेच 30 मिनिटे व्यायाम करणे फायद्याचे ठरते.आज आपण वजन कमी करण्यासाठी डायट प्लान पाहणार आहोत. यामुळे तूमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

Diet Plan
Diet Plan: वयाच्या पन्नाशीत ३० वर्षांचं कसं दिसावं ? रवीना टंडनचं डाएट सीक्रेट एकदा वाचाच

तुम्हाला किती वजन कमी करायचे आहे ते ठरवा आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दर आठवड्याला आणि महिन्याला किती मेहनत करावी लागेल त्याचा प्लॅन बनवा. जेवण घेताना ते वेगवेगळ्या वेळी घ्या. काही लोक एकाचवेळी भरपूर खातात? त्यामुळे थोड्या अंतराने खा.

सकाळी उठल्यावर बडीशेप, लिंबू, मेथीचे पाणी

एक ग्लास पाण्यात बडीशेप किंवा मेथी रात्रभर भिजत ठेवा. सकाळी पाणी गाळून प्यावे. तुम्ही गरम पाण्यात लिंबू टाकूनही ते पिऊ शकता. हे डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करते.

Diet Plan
Health Tips : स्टॅमिना वाढवायचाय? ट्राय करा 'या' टिप्स

नाश्ता मूग डाळ चिला

तुमचा नाश्ता प्रोटीनयुक्त असला पाहीजे. तुम्ही तुमच्या नाश्त्यात मूग डाळ चीला खाऊ शकता. दुधी भोपळ्याचा चीला देखील खाऊ शकता किंवा 2 इडल्या आणि 1 कप सांभर घेऊ शकता.

दुपारचे जेवण

ओट्सपासून बनवलेली चपाती, 1 वाटी भाजी आणि सॅलड असे जेवण करावे. यासोबत 1 कप दही घ्यावे.

Diet Plan
Health : अंडी खाताय,फायदे माहिती आहेत का?

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण 7 वाजता करावे. यामध्ये भाजी आणि दही १ रोटी मिक्स करा. सोबत तुम्ही अर्धा कप सॅलड 1 क्विनोआ कप आणि उकडलेले मसूर देखील खाऊ शकता.

यासोबत मधल्या वेळेत काही खावेसे वाटले तर पाणी जास्त प्यावे. किंवा ड्रायफ्रूट्स खाल्ले तरी चालतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.