आवडणारा व्यायाम करा

सध्याच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्‌या निरोगी राहणे खूप गरजेचे आहे.
actress prachi bohra
actress prachi bohrasakal
Updated on

- प्राची बोहरा, अभिनेत्री

सध्याच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्‌या निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मी बॅडमिंटन खेळणे, क्रिकेट खेळणे अशा खूप शारीरिक ॲक्टिव्हिटीज करते. अनेकदा धावायला जाते आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा स्ट्रेचिंगही करते.

मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी मला असं वाटतं, की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, त्यामध्ये आपण स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. माझ्यासाठी कुटुंबीयांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणे, ही माझ्यासाठी खूप आनंददायी बाब आहे. कुटुंबीय हेच माझे स्ट्रेसबस्टर्स आहेत. माझ्या आयुष्यात खूप कमी मित्र आहेत; पण ज्या-ज्या वेळेला मी त्यांच्यासोबत असते, त्या-त्या वेळेला माझं हृदय समाधानाने भरून पावलेलं असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.