Health Care: दूध आणि केळी हे दोन्ही शक्तीवर्धक पदार्थ असून ते खाण्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. मात्र हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी आरोग्यदायी असले तरी ते एकत्र खाऊ नये. अनेकांना दूध आणि केळीचे एकत्रित कालवण खाण्याची सवय असते. मात्र असे करण्याआधी तुम्ही एकदा ते खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर काय विपरीत परिणाम होऊ शकतात ते जाणून घ्या.
दूध आणि केळी एकत्र खाण्याचे परिणाम
दूध आणि केली एकत्र खाल्ल्याने आपल्या मांसपेशी मजबूत होतात त्याबरोबरच वजनही कमी होते. परंतु आयुर्वेदामध्ये या दोघांना एकत्र खाण्याचे काही दुष्परिणाम सांगितले आहे. हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने तुमच्या शरीरावर त्याचा घातक परिणाम होऊ शकतो.
दूधात कॅल्शियम, प्रोटीन विटॅमिन बी (calcium) आणि अनेक पोषक घटकं असतात. तर केळीमध्ये फायबर आणि पोटॅशियम, मॅग्नेशियमही (fiber) आहे. परंतु आयुर्वेदात मात्र केळीसोबत दूधाचे सेवन करणं योग्य मानलं गेलेलं नाही. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की या दोघांचे एकत्र सेवन केल्यानं आपली पचनक्रिया सुधारते. (Health)
प्राचीन भारतीय चिकित्सामध्ये केळं आणि दूध आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसल्याचं सांगितलं गेलं आहे. या दोघांच्या सेवनानं तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो.
दूध आणि केळीचं एकत्र सेवन केल्यानं पोटात गॅस, सर्दी, खोकला (stomach infection) आणि साइनस सारखे प्रभाव उद्भवू शकतात. अशा परिणामांपासून दूर राहण्यासाठी आपण दूध आणि केळ खाताना त्यामध्ये निदान 20 मिनिटांचे तरी अंतर ठेवले पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.