Body Pain Cure: अंगदुखीकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं धोकादायक...

स्नायू दुखण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे टेंशन, स्ट्रेस, दगदग आणि किरकोळ जखमा. या प्रकारची वेदना
Body Pain Cure
Body Pain Cureesakal
Updated on

Body Pain Cure: अनेकदा तुम्ही बघितलं असेल की लोकांच्या शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात सतत वेदना होत असतात. ही वेदना सामान्य आणि तीव्र दोन्ही प्रकारची असू शकते. अशा दुखण्याकडे अनेकदा लोकं दुर्लक्ष करतात पण ते करुन चालणार नाही. कारण, मज्जातंतूंमुळे अन् शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकदा असे घडते.

या दुखण्याकडे दुर्लक्ष करु नका

छातीत दुखणे: जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखत असेल आणि ही वेदना दीर्घकाळ होत असेल तर ती हार्ट अटॅकच्या (heart attcak Symptoms) लक्षणांपैकी एक असू शकते. जेव्हा रक्ताद्वारे ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहचत नाही तेव्हा असे होते. या प्रकरणात, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मूत्रपिंडात वेदना: जेव्हा एखाद्या व्यक्तीला मूत्रपिंडात वेदना जाणवते आणि ती वेदना बऱ्याच काळापासून होत आहे, तेव्हा याचा अर्थ असा होऊ शकतो की ही स्टोनची (Kidney stone symptoms) लक्षण आहेत. त्याच भागात सौम्य आणि वेदना हे स्टोनच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे.

हात-पाय दुखणे: जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वेदना होत असतील तसेच तुमच्या हात आणि पायांना मुंग्या येणे, अंगठ्यामध्ये बधीरपणा इत्यादी जाणवत असतील तर हे सायटिका चे लक्षणांपैकी एक असू शकते. या प्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे.

पोट दुखणे: जर तुम्हाला पोटात दुखत असेल आणि त्यासोबत तुम्हाला मळमळ, उलट्या यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर हे स्वादुपिंडाचा दाहच्या (Pancreatitis) लक्षणांपैकी एक असू शकते. या प्रकरणात, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डोके दुखी: डोकेदुखीसोबतच व्यक्तीला थकवा, चिडचिड, नैराश्य इत्यादी लक्षणे दिसतात. ही लक्षणे मज्जासंस्थेतील अडथळे किंवा मायग्रेनमुळे (migraine) दिसू शकतात. अशा परिस्थितीत, व्यक्तीने लक्षणे ओळखून डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Body Pain Cure
Health Tips: काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिताय तर थांबा, होईल नुकसान

स्नायू दुखण्याची कारणे:

स्नायू दुखण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे टेंशन, स्ट्रेस, दगदग आणि किरकोळ जखमा. या प्रकारची वेदना सहसा फक्त काही स्नायू किंवा आपल्या शरीराच्या एका लहान भागापर्यंत मर्यादित असते.

तुमच्या संपूर्ण शरीरात जाणवणारे स्नायू दुखणे बहुतेकदा फ्लूसारख्या संसर्गामुळे होते. इतर कारणांमध्ये अधिक-गंभीर परिस्थितींचा समावेश होतो, जसे की काही रोग किंवा स्नायूंवर परिणाम करणारे आरोग्य. स्नायू दुखणे हे काही औषधांचे दुष्परिणाम देखील असू शकतात.

Body Pain Cure
Multiple Health Problems : तुमच्या तोंडाची चवच गेलीय का? असू शकतात हे गंभीर आजार!

दुखणे कमी करण्यासाठी हे उपाय करा

रोज थोडा व्यायाम: चालणे, पोहणे, बागकाम आणि डान्स यासारख्या साध्या, दैनंदिन अॅक्टिविटींमुळे शरीराची हालचाल व्यवस्थित होते अन् काही वेदना थेट कमी होऊ शकतात.

मेडिटेशन: डोके दुखी, स्ट्रेस यांसारख्या आजारांवर एक रामबाण उपाय म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशनमुळे आपला तणाव कमी होतो आणि बरे वाटते.

पुस्तके आणि मासिके वाचा: वाचन केल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात शिवाय त्याने आपले मन स्थिर राहते. सतत दुखत आहे दुखत आहे असं करत बसलात तर मग त्यातच लक्ष राहील. म्हणून पुस्तके आणि मासिके वाचा.

गप्पा मारा: आपल्या जवळच्या माणसाशी गप्पा मारल्यानेही अनेक प्रॉब्लेम सॉल्व होतात शिवाय याने मनावरचा भार कमी होतो. शिवाय आपले मन प्रसन्न होते आणि मन प्रसन्न असले की आपली प्रकृती सुद्धा बरी राहते.

Body Pain Cure
Mosquito Quail Health Problems : डासांची घालवण्याची ही जूनी पद्धत आरोग्यासाठी घातक,संशोधकांचा दावा

उत्तम आहार: मान्य आहे तुमचं शेड्यूल, जीवनशैली खूप व्यस्त आहे पण म्हणून पोटाकडे दुर्लक्ष करुन कसं चालेल? उत्तम आहार घ्या, डायट फॉलो करा. फार काही जमत नसेल तर निदान दोन वेळच जेवण वेळोवेळी करा. यानेही खूप फायदा होईल.

स्वतःला विचलित करा: तुमचे लक्ष दुसर्‍या कशाकडे वळवा जेणेकरुन फक्त आपल्याला त्रास होतो आहे हे तुमच्या डोक्यात राहणार नाही. परिणामी आपोआप दुखण पळून जाईल. तुम्हाला आनंद वाटणाऱ्या गोष्टी करा; जसे की फोटोग्राफी, शिवणकाम किंवा विणकाम यासारखे अनेक छंद जोपासा.

झोप घ्या: उत्तम झोप सगळ्यात महत्वाची. शरीराला उत्तम झोप मिळाली तर मग अनेक आजार बरे होतात त्यामुळे 6 तासाची पूर्ण झोप घ्या. रोजच्या दिवसात शक्य नसेल तर वीकेंडला जरा जास्त झोप घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()