Sugar Intake In Pile Patients : मूळव्याध रूग्णांनी गोड पदार्थ खावेत की नाही? एक्सपर्ट्सकडून जाणून घ्या परिणाम

ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे अशा लोकांमध्ये अनेकदा गोड पदार्थांच्या सेवनाबाबत संभ्रम असल्याचे दिसून येते
Sugar Intake In Pile Patients
Sugar Intake In Pile Patients esakal
Updated on

Sugar Intake In Pile Patients : प्रत्येकाला गोड खायला आवडते. आपण दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साखर खातो. परंतु साखरेचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे असा सल्ला नेहमीच तज्ज्ञांकडून दिला जातो. साखर चवीला गोड लागत असली तरी त्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. कुठल्याही विशेष सणाच्या वेळी गोड पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात केल्यास तुम्हाला नुकसान नाही, परंतु त्यांचे नियमित सेवन करणे योग्य नाही.

ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे अशा लोकांमध्ये अनेकदा गोड पदार्थांच्या सेवनाबाबत संभ्रम असल्याचे दिसून येते. मिठाई खावी की नाही, असे विविध प्रश्न त्यांच्या मनात असतात. चला तर मग तुमच्या या प्रश्नांचे उत्तर तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

मूळव्याधच्या काही प्रकरणांमध्ये, लोकांना अनेकदा मिठाई खाल्ल्यानंतर शौचेच्या ठिकाणी त्रास आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, त्यांनी मिठाई खावी की नाही हे जाणून घेणे त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे आहे.

मूळव्याधीत साखर खावी की नाही?

याचे प्रामाणिक उत्तर असेल नाही. जर एखाद्या व्यक्तीला मूळव्याध असेल तर त्याने त्याच्या आहारातून साखर पूर्णपणे वगळली पाहिजे. क्वचित साखर खाण्याचे काहीही तोटे नाही, पण साखर तुमच्या आहाराचा भाग असेल तर आजपासूनच साखरेपासून दूर राहा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल मात्र काही प्रकरणांमध्ये गोड पदार्थांचे अतिसेवन हे मूळव्याध होण्याचे कारण असू शकते.

Sugar Intake In Pile Patients
Piles Problem दूर करण्यासाठी काकडीच्या बिया ठरतील रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

जेव्हा तुम्ही गोड पदार्थ खातात तेव्हा त्यात प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखर असते. यात पोषण अजिबात नसते. याव्यतिरिक्त, त्यांच्यामध्ये असलेले आहारातील फायबर देखील प्रक्रियेदरम्यान पूर्णपणे काढून टाकले जाते. त्यातील मूलभूत पोषक तत्वेही नष्ट होतात. तेव्हा तुम्ही गोड खाणे टाळावे. कारण जेव्हा तुम्ही त्याचे अधिक सेवन करता तेव्हा शरीरातील सूज वाढते. त्याच वेळी, मूळव्याध रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता देखील वाढवू शकते. यामुळे तुमची प्रकृती अधिक गंभीर होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या आहारातून साखर वगळली तर तुम्हाला लवकर बरे होण्यास खूप मदत होते. (Health)

फक्त मूळव्याधीतच नाही तर असेसुद्धा प्रक्रिया केलेली साखर आणि त्यापासून बनवलेले पदार्थ कमीत कमी घ्या. कारण त्यामुळे शरीरात इतरही अनेक आजार होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.