Health Tips : रोज सकाळी चहा बिस्किट खाताय? मग तज्ज्ञांचा हा सल्ला एकदा वाचाच

आपल्याकडच्या लोकांचं आणि चहाच नातं फार वेगळं आहे इतकं की चहाशिवाय लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही
Healthy Tea Tips
Healthy Tea Tips esakal
Updated on

Healthy Tea Tips : चहाला वेळ नसली तरी चालते पण वेळेला चहा हा हवाच... एखाद्या चहाप्रेमीला कधीतरी चुकून चहा पिण्याचे दुष्परिणाम सांगून बघितले आहे का? उत्तर येतं मरणच येणार असेल तर चहानेच येऊ देत... आपल्याकडच्या लोकांचं आणि चहाच नातं फार वेगळं आहे इतकं की चहाशिवाय लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा हा लागतोच. काही लोकं सकाळचा नाश्ता टाळून चहा - चपाती, चहा - ब्रेड, चहा - बिस्किटे असे कॉम्बिनेशन ट्राय करतात.

पण, चहा आणि बिस्किटे हे कॉम्बिनेशन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही. कारण चहा आणि बिस्किटे खाऊन आपण बसल्या - बसल्या आजारांना आमंत्रण देतो. या संदर्भात, आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Healthy Tea Tips
Green Tea : ग्रीन टी पित असाल तर आत्ताच थांबा ! असा आहे धोका

त्या म्हणतात, ''दिवसाची सुरुवात चहा - बिस्किटांनी केल्यास अॅसिडिटीचा त्रास वाढतो. पोटातील चरबी आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते, लठ्ठपणाची समस्या होऊ शकते. सकाळच्या नाश्त्यात रिकाम्या पोटी चहा आणि बिस्किट खाल्ल्याने, शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा बिस्किट खाऊ नये.''

Healthy Tea Tips
Tea with Cigarette : चहासोबत सिगारेट पिण्याची सवय आहे? आताच थांबवा...

१. रोगप्रतिकारशक्ती कमी होणे

बिस्किटांमध्ये साखर आणि कर्बोदकं याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. रक्तातील साखर जास्त झाल्यास त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यावर होतो. 

Healthy Tea Tips
Green Tea Herbal Shampoo : Smooth & Silky केसांसाठी घरीच तयार करा शॅम्पू, केस करतील शाइन

२. दात खराब होणे

बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, त्याचा थेट परिणाम दातांवर होतो. दातांमध्ये बॅक्टेरिया आणि सडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Healthy Tea Tips
Tea Making Mistake : चहा बनवताना केलेल्या 'या' चुका ठरतील घातक, वेळीच सावध व्हा नाहीतर...

३. स्किन एजिंग

चहामधील कॅफीन आणि बिस्किटांमधील साखर हे दोन घटक वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. ज्याचा थेट नकारात्मक परिणाम त्वचेवर होतो. चहा आणि बिस्किटांचे सेवन केल्याने मुरुमांची समस्या वाढू शकते. ज्यामुळे कमी वयातच स्किन एजिंगची समस्या निर्माण होऊ शकते.

Healthy Tea Tips
Tea Coffee : दिवसातून एवढ्या वेळा चहा-कॉफी पिणे ठरेल घातक

४. पचनाशी संबंधित समस्या

बिस्किटे बनवण्यासाठी तेल, मैदा आणि साखरेचा वापर केला जातो. ज्यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता, छातीत जळजळ आणि पचनाशी संबंधित समस्या होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()