Earphone Side Effects: तुमच्याही कानात असतात का नेहमी हेडफोन? काळजी घेतली नाही तर...वाचा तज्ज्ञांचं मत

सध्या कानाचे विकार प्रखर्षाने समोर येता आहेत आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे हेडफोन्सचा वापर...
Health Tips for Ear
Health Tips for Earesakal
Updated on

डॉ. मनोज बाऊस्कर

सध्या कानाचे विकार प्रखर्षाने समोर येता आहेत आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे हेडफोन्सचा वापर... सध्या वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन सुरु असलेल्या शाळा, घर बसल्या वेब सिरीज पाहणे, सतत फोन सुरु असणे आणि त्याकरिता तासंतास इअरफोन्सचा वापर करण्याचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. Earphone Side Effects

यामुळे डोके दुखी, कान दुखणे अशा समस्या बघायला मिळतात. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असून इअरफोनचा वापर कमी करणं गरजेचं आहे. इअरफोनच्या नियमित वापरामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. कानाचा पडदा वायब्रेट व्हायला लागतो. दूरचा आवाज ऐकण्यात त्रास होतो. यामुळे तुम्हाला बहिरेपणा देखील येऊ शकतो. तसेच कान दुखणे, डोकेदुखी, झोप न येणे अशा समस्या उद्भवतात. (Harmful Effects Of Listening Music With Earphones)

Health Tips for Ear
Health Tips : बिअर प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतंय? काय सांगतो अहवाल...

इअरफोन कानात घालून मोठ्या आवजात गाणी ऐकल्याने मानसिक ताण वाढू शकतो. इअरफोनच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याला हानी पोहोचते. अधिक वेळ इअरफोनच्या वापराने कानातील पेशी मृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना इअरफोन वापरापासून परावृत्त करणं गरजेचं आहे.

Health Tips for Ear
Health Tips : रात्री उशीरा झोपण्याचे आरोग्यासाठी तोटे

तसंच मोठ्यांनीही कानाच्या विकाराचा धोका समजून घेत इअरफोनचा वापर करणे आवश्यक आहे. जास्त वेळ इअरफोनचा वापर केल्यास कानात हवा जाण्याच मार्ग राहत नाही आणि त्यामुळे कानात संसर्ग होऊन त्याचा परिणाम श्रवणशक्तीवर होऊ शकतो. सततच्या वापराने जीवणुंची वाढ होऊन कानात मळ साठू शकतो.

Health Tips for Ear
Skin Tips : फक्त २०० रुपयांत मिळवा दिपिका सारखा ऑइल फ्री चेहरा! हे ५ फेस क्रीम करतील मदत

इअरफोनमधून निघणारे चुंबकीय तरंग मेंदुला नुकसान पोहोचवून त्यावर वाईट परिणाम करू शकतात. हेडफोन वापरण्याने कानाच्या बाहेरील भागात त्वचेचा संसर्ग होतो. कानाच्या त्वचेला रॅश येणे, त्वचेला फोड येणे, कानात बुरशी होणे, तयार झालेला मळ बाहेर न पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. कानाच्या आतील भागात आवाज प्रदूषणामुळे बहिरेपणा वाढण्याचा धोका आहे.

Health Tips for Ear
Ear Cotton Buds: कानातला मळ काढण्यासाठी तुम्हीही कॉटन बड वापरता का? आताच थांबवा नाहीतर...

दुस-या व्यक्तीने वापरलेले हेडफोन्स स्वच्छ करून मगच त्याचा वापर करा. जेणेकरून कानाचा संसर्ग पसरणार नाही. इअरफोन्सचा वापर कानांसोबत हृदयालाही नुकसानदायी होऊ शकते. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढू शकते. यावर एकमेव उपाय म्हणजे इअरफोनचा वापर कामाशिवाय करणे टाळणे किंवा कमीच करणे.

(लेखक हे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे कान, नाक घसा विकार तज्ज्ञ आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.