Acidity Remedies : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नॉट रिचेबेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती पुढे अजित पवार यांनी मीडियासमोर येऊन या चर्चांना पुर्णविराम लावला.
अजित पवार म्हणाले, "मी सतत दौरे करत असतो त्यामुळे जागरण होत असतो माणूस आहे कधी आजारी पडू शकतो काल मला पित्ताचा त्रास झाल्यामुळे बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी औषध घेऊन विश्रांती घेतली परंतु माध्यमातून विपर्यास करण्यात आला." ते पुढे हे पण म्हणाले, "मला वारंवार पित्ताचा त्रास होत असतो."
तुम्हालाही अजित पवारांसारखा वारंवार पित्ताचा त्रास होतो का? जर हो तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (do you have acidity problem like ncp leader ajit pawar read home remedies of acidity )
अनेक लोकांना वारंवार पित्ताचा त्रास होत असतो. अत्याधिक पित्ताच्या त्रासामुळे शरीरात जागोजागी सूज येणे, रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब, जळजळणे, पोट झाडणे, त्वचेवर फोड, चट्टे उठणे, असे लक्षणे दिसून येतात.
यासाठी अनेकदा डॉक्टरांकडे जाऊनही काहीही फायदा होत नाही मग अशावेळी घरगुती उपाय करणे गरजेचे असते.
१. योग्य आहाराचे सेवन करा
पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी आहाराचे सेवन करावे. कडवट, तुरट, मधुर चवीचा आहार घ्यावा. दुध, तूप, लोणी हे उत्तमरीत्या पित्ताचे शमन करतात. आंबट फळांऐवजी गोड फळे खावे. मध आणि काकवी सोडून बाकी गोड वस्तूंचाही तुम्ही वापर करू शकता.
२. योग्य आरामाची वेळ
काम आणि विश्रांती ह्यात योग्य समन्वय साधा. खूप लोळणे टाळा आणि योग्य वेळी झोपा. उशीरा झोपणे टाळा
३. ध्यान करा
ध्यान करा. ध्यान केल्यामुळे पित्त प्रकृती स्थिर राहते.
४. योगासन करा
मार्जारासन, शिशू आसन, चंद्र नमस्कार, उत्कटासन, भुजंगासन, विपरीत शलभासन, पश्चीमोत्तानासन, अर्धनौकासन, अर्धसर्वांगासन, सेतूबंधासन, शवासन करा. यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.
५. याशिवाय सकाळी दोन ग्लास कोमट पाणी प्यावे किंवा कोमट पाण्यात तुळशीचे पाने टाकून प्यावी यामुळे पित्त कमी होते.
6. जेवल्यानंतर अर्धा चमच बडीशेप खाल्यानेही पित्त कमी होते.
७. पित्त झाल्यानंतर काहीही खाल्यानंतर थोडा गुळ खावा, यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.