अनेकदा आपल्या छातीत अचानक कळ येतो किंवा छाती अचानक दुखायला लागते अशावेळी काय करावं काही नाही असं होतं. अनेकांना तर मला हार्ट अटॅक तर येणार नाही, अशी भीती वाटायला लागते पण भ्यायचं काहीही कारण नाही.
छाती दुखण्यामागे आणि कळ येण्यामागे अनेक कारणे असतात जसे योग्य पोझिशनमध्ये न झोपणे किंवा योग्य पोझिशनमध्ये न बसणे इत्यादी.
जर तुमच्याही छातीत कळ किंवा छाती दुखत असेल तर तुम्हीही त्वरीत काही उपाय करू शकता.
डावा हात सरळ करून मूठ बांधा. मूठ पालथी होईल असा हात वळवून हात ताठ करा. नंतर, जेथे पंजा संपतो त्या बिंदू पासून कोपरापर्यंत, याचा मध्य बिंदू शोधा. आता त्या बिंदूवर बोटाने/अंगठ्याने किंचित दाब देऊन, तेथे दुखते आहे कां, याचा अंदाज घ्या.
जर दुखत असेल तर ३-५ मिनिटे ( सोसवेल इतपतच ) ॲक्युप्रेशर द्या. या बिंदूवर दुखत असल्यास दुखणे हार्ट शी संबंधित आहे, असे समजावे.
हार्टशी संबंधित, शंकानिरसनासाठी, चाचण्या करून घ्या. त्या बिंदूवर दुखत नसल्यास, गॅसेसमुळे कळ मारते, असे समजावे.
याशिवाय मेडीटेशन करा. याचाही उत्तम फायदा तुम्हाला होणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.