सिंगल लोकांचा या आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त, अशी घ्या काळजी

सिंगल लोकांचा या गंभीर आजारामुळे होऊ शकतो मृत्यू...
Does being married reduce the risk of cancer?
Does being married reduce the risk of cancer?सकाळ डिजिटल टीम
Updated on

लग्न झालेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोकांचा पोटाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. तसेच लग्न झालेल्या लोकांची कॅन्सरमधून वाचण्याची शक्यता खूप जास्त असते, असेही या अभ्यासात सांगितलं गेलं आहे.

सिंगल राहिल्यामुळे किंवा लग्न न केल्यामुळे खरच कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो का? व्यक्ती विवाहित असला तर कॅन्सर बरा होण्याची शक्यता वाढते का?

तर याचे उत्तर हो आहे. तुम्ही जर जोडीदारासोबत राहत असाल तर तुम्हाला झालेला कॅन्सर लवकर बरा होतो.

हे आम्ही नाही सांगत आहोत तर ही गोष्ट एका संशोधनातून सिध्द झाली आहे आणि त्यातून हा निष्कर्ष समोर आला आहे की,जर तुम्हाला कॅन्सर झाला आणि तुम्ही विवाहित असाल तर तुमचा मृत्यूचा धोका कमी होऊ शकते. संशोधक सांगतात की,

लग्न झालेल्या लोकांमध्ये सर्व्हायवल रेट अधिक असतो. त्यानंतर येतात सिंगल लोक आणि काही कारणामुळे आपल्या जोडीदारापासून वेगळे झालेल्यांचा नंबर यात अगदी शेवटी लागतो.

SWNS ने दिलेल्या माहितीनुसार, ॲनह्युई मेडिकल युनिव्हर्सिटीतील कॉरस्पॉंडिंग ऑथर प्रोफेसर ॲमन ह्यू यांच्या मतानुसार, विवाहीत लोक हे आर्थिकदृष्ट्या स्टेबल असतात. त्यांना आपल्या जोडीदाराकडून वेळोवेळी मानसिक आधारही मिळतो.

Does being married reduce the risk of cancer?
रक्ताचा कॅन्सर बरा होतो : डॉ. गणपुले

संपूर्ण जगात, कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये पोटाचा कॅन्सर हे तिसऱ्या क्रमांकाचे मुख्य कारण आहे. अमेरिकेत कॅन्सरमुळे दरवर्षी ११ हजार नागरिकांचा मृत्यू होतात.

असे काही कॅन्सर पेशंट आहे की ज्यांना कॅन्सर झालाय पण तो बाकी शरीरात पसरलेला नाही. अमेरिकेतील अशा ३६४७ केसेसचा प्रोफेसर ह्यू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला. या सर्व पेशंट्सचे निदान २०१० ते २०१५ या कालावधीत झाले होते.

लग्न झालेल्या लोकांची वाचण्याची शक्यता ७२% इतकी होती. नवऱ्याच्या तुलनेत बायकोची, जिवंत राहण्याची शक्यता अधिक ७६% होती, असेही या संशोधनातून समोर आले. तर ज्या पुरुषांच्या बायकोचा मृत्यू झाला आहे, त्यांचा जीव वाचण्याची शक्यता खूप कमी म्हणजे ५१% होती.

Does being married reduce the risk of cancer?
Mahima Chaudhary: महिमाला 'ब्रेस्ट कॅन्सर', अनुपम खेर यांची पोस्ट

पोटाचा कॅन्सर म्हणजे नेमक काय असतं?

आपण रोज जे अन्न खातो, ते सरळ आपल्या पोटात जाते. आणि पोटात गेल्यावर त्याची तिथे अन्नपचनाची क्रिया सुरू होते. पोटात गेलेल्या काही गोष्टीमुळे पोटाच्या आतल्या भागात कॅन्सरच्या पेशी तयार होण्यास सुरूवात होते आणि काही काळातच त्याचा ट्युमर विकसित होतो, यालाच कॅन्सर म्हणतात.

पोटाचा कॅन्सर हा शरीरात अनेक वर्षे हळूहळू वाढत असतो आणि एकदा का त्यांची वाढ झपाट्याने सुरू झाली की मग तो शरीराच्या इतर भागांतही पसरू लागतो.

Does being married reduce the risk of cancer?
कॅन्सर रोगामुळे होणारे अकाली मृत्यू निश्‍चित टळतील; तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा

पोटाच्या कॅन्सरची लक्षणं कोणती असतात?

१) जेवणाचा घास घेतल्यानंतर अन्न गिळण्यास त्रास होणे.

२) जेवणानंतर पोटात रक्तस्त्राव झाल्यासारखे वाटणे.

३) अन्नाच्या दोन-तीन घासातच पोट भरल्यासारखे वाटणे.

४) जळजळ होणे,पोटाच्या आतड्यात दुखणे.

५) काही कारण नसताना अचानक वजन कमी होणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()