Cause Heart Attacks : फोन जास्त वापरल्याने हृदयविकाराचा झटका येतो का? सत्य जाणून घ्या

स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे
Cause Heart Attacks
Cause Heart Attacksesakal
Updated on

Cause Heart Attacks : स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, बहुतेक लोक त्यांच्या मोबाईलपासून दूर राहू शकत नाहीत. काही लोकांना दर मिनिटाला फोन चेक करण्याची सवय असते तर काहींना प्रत्येक क्षणी फोन चेक करण्याची सवय असते. पण तुमची हीच सवय तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का?

मोबाईल फोन वापरण्याची सवय लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे, जी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. लहान मुलेही आता मोबाईलवर खेळताना दिसतात, मुलांच्या स्क्रीन टाइमिंगचा वाढता परिणाम जाणून घेण्यासाठी अनेक संशोधने केली जात आहेत आणि संशोधनाचे निष्कर्ष खूपच धक्कादायक आहेत.

Cause Heart Attacks
Health Tips : जास्त लोणचे खाल तर दवाखान्यात जाल? पटत नसेल तर वाचा

मुलांमध्ये स्क्रीन टाइम वाढल्याने त्याचा मेंदू आणि वाढीवर खोलवर परिणाम होत आहे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी काँग्रेस 2023 च्या नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, जी मुले मोबाईल स्क्रीनवर जास्त वेळ खेळत राहतात किंवा इतर कोणतेही काम करत असतात, त्यांना तरुणपणाच्या सुरुवातीच्या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.

Cause Heart Attacks
Child Mental Health : सोशल मीडियावर तुमची मुलं किती वेळ घालवताय? 76% टक्के मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

संशोधनाच्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, जी मुले लहान वयातच बाहेर मित्रांसोबत खेळण्याऐवजी मोबाईल गेम खेळण्यात जास्त वेळ घालवतात, अशा मुलांना लहान वयातच हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका असतो.

Cause Heart Attacks
Children Mental Health : मुलांनाही असतो Stress अन् Tension;  असे बनवा त्यांना मानसिकदृष्ट्या Strong

अशा मुलांना वाचवा

मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करण्यासाठी पालकांना मुलांचा मोबाइलवरील स्क्रीन टाईम कमी करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हालाही तुमच्या मुलाचा स्क्रीन टाइम कमी करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा स्क्रीन टाइमही कमी करावा लागेल. तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम कमी करा आणि तुमच्या मुलांसोबत खेळा जेणेकरून तुमची मुले मोबाईलचा वापर शक्य तितका कमी करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.