Rice for Weight Loss: या पद्धतीने भात शिजवून खाल तर वाढणार नाही वजन

Is Rice Good for Weight Loss? भाताने वजन वाढतं असा समज असल्याने अलिकडे अनेकजण भात खाणं टाळतात. मात्र भात खाल्ल्याने खरचं वजन वाढतं का? तर अगदी जास्त प्रमाणात तुम्ही भात खाल्लात तर काही प्रमाणात वजन वाढू शकतं. मात्र यासाठी फक्त भात हा पदार्थ कारणीभूत नाही
Rice for Weight Loss
Rice for Weight LossEsakal
Updated on

Rice for Weight Loss: अलिकडे अगदी लहान मुलांपासून ते वयोनृद्धांपर्यत सगळ्यांमध्ये वाढत्या वजनाची समस्या पाहायला मिळतेय. प्रोसेस्ड फूड Processed Food आणि चुकीच्या आहार पद्धती आणि जीवनशैलीमुळे वजन वाढण्याची Weight Gain समस्या वाढू लागली आहे.

वजन अधिक असल्याने आरोग्याच्या इतर समस्यांनादेखील तोंड द्यावं लागतं. अशात आता अनेकजण वजन Body Weight कमी ठेवण्यासाठीदेखील प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय. Does Rice consumption in meal increases weight

यासाठी अनेकजण वेगवेगळे डाएट प्लॅन Diet Plan फॉलो करतात. मात्र सगळ्यात आधी जेवणाच्या ताटून गायब होतो तो म्हणजे भात. भार Rice खाल्ल्याने वजन वाढू शकतं अशा विचारात अनेकजण डाएटमध्ये भात खाणं टाळतात. यात खास करून भातप्रेमींसाठी मोठी अडचण निर्माण होते. How to lose weight

भाताने वजन वाढतं असा समज असल्याने अलिकडे अनेकजण भात खाणं टाळतात. मात्र भात खाल्ल्याने खरचं वजन वाढतं का? तर अगदी जास्त प्रमाणात तुम्ही भात खाल्ला तर काही प्रमाणात वजन वाढू शकतं मात्र यासाठी फक्त भात हा पदार्थ कारणीभूत नसून इतर गोष्टींचा देखील वजन वाढण्यावर प्रभाव पडत असतो.

त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तरी तुम्ही भात नक्कीच खाऊ शकता. यासाठी फक्त भात किती प्रमाणात खावा आणि तो कसा शिजवावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे. (How To cool rice for weight loss) काही युक्त्या वापरून भातामधील कॅलरीजचं प्रमाण कमी करणं शक्य आहे. यामुळे तुम्ही बिनधास्त भात खाऊ शकता. 

पबमेडने केलेल्या संशोधनानुसाक संपूर्ण आशिया खंडात भाताच्या म्हणजेच तांदळाच्या जवळपास एक लाखांहून अधिक जाती आहेत. यातील पोषक तत्वांचं प्रमाण आणि गुणवत्ता वेगवेगळी आहे. काही तांदळामध्ये कॅलरीजच प्रमाण अधिक आहे.

मात्र कॅलरी अधिक असल्या तरी या तांदळांमध्य काही महत्वाची पोषक तत्व आहेत जी शरीरासाठी आरोग्यदायी आहेत. यामुळेच तांदूळ शिजवण्याच्या प्रक्रियेत काही बदल करून तुम्ही डाएटमध्ये भात खाण्याचं समाधान मिळवू शकता.

तांदळामध्ये सेलेनियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी, मॅगनीज, आयरन, फॉलिक ऍसिड, थायमिन आणि फायबर यांचा अधिक प्रमाण असतं. त्यामुळे भात खाल्याने शरीराला पुरेसा पोषण आहारही मिळतो. Healthy rice

अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता भात

तज्ञांच्या मते भात हा जास्त फायबर असलेल्या आणि जास्त प्रोटीन असलेल्या पदार्थांसोबत खाल्ल्यास ते फायदेशीर ठरू शकतं. यात दाळ, दही, पनीर, अंडी किंवा मांसासोबत भात खाऊ शकता. Right way to eat rice

वजन कमी करण्यासाठी कोणता भात खावा

वजन कमी करायचं असल्यास तुम्ही आहारामध्ये ब्राउन राईस किंवा ब्लॅक राईसचा समावेश करू शकता. Brown rice for weight loss. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत या तांदळांमध्ये अधिक फायबर आणि पोषक तत्व असता. यामुळे पोट भरलेलं राहतं जेणेकरून सारखी भूक लागत नाही. 

हे देखिल वाचा-

Rice for Weight Loss
Weight Gain : वजन वाढवण्यासाठी अशाप्रकारे खा केळं

वजन कमी करण्यासाठी असा शिजवा भात

भात शिजवताना काही टिप्स वापरल्यास आपण भातातील अतिरिक्त कॅलरीज कमी करू शकतो. वजन कमी करण्यासाठी भात शिजवत असताना प्रेशर कुकरचा वापर टाळावा. 

  1. तांदूळ शिजवण्याआदी अर्धा तास भिजत ठेवावा. यामुळे यातील पोषक तत्व वाढण्यास मदत होते शिवाय लवकरही शिजतो. 

  2. आता भात शिवण्यासाठी एक मोठं पातेल घ्या त्यात गरजेनुसार पाणी टाकून चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर त्यात दोन चमचे किंवा तांदूळाच्या प्रमाणानुसार नारळाचं तेल टाका.

  3. त्यानंतर भिजत घातलेल्या तांदळातील पाणी निथळावं आणि तांदूळ उकळणाऱ्या पाण्यात टाकावे. थोडावेळे पातेल्यावर झाकण ठेवून शिजवावं त्यानंतर तुम्ही झाकण काढू शकता किंवा अर्ध बाजूला करा जेणेकरून उकळलेलं पाणी बाहेर जाणार नाही.

  4. तांदूळ शिजत आला की तो थोडा फूलतो आणि लांब दिसू लागतो. एका चमच्याच्या मदतीने तुम्ही तांदळाने एक दोन दाणे काढून तांदूळ शिजला आहे का तपासू शकता.

  5. जर तांदूळ पूर्ण शिजला असेल तर एका मोठ्या चाळणीत हा भात काढा यामुले जास्तिच पाणी निघून जाईल. या पाण्यात कार्ब असल्याने वजन वाढतं यामुळे हे पाणी काढून टाकावं.

  6. सर्व पाणी निघाल्यानंतर एका चमचाच्या मदतीने भात हलवा. जेणेकरून त्यातील वाफ निघून जाईल. त्यानंतर थोडावेळ तुम्ही चाळणीतील शिजलेल्या भातावर झाकण टेवू शकता. यामुळे शिजलेला भात ओला राहणार नाही. उरलेल्या वाफेत तो कोरडा होईल. अशा प्रकारे तुमचा भात खाण्यासाठी तयार होईल. 

हा शिजलेला भात तुम्ही दही, डाल किंवा भाज्यांसोबत वाढून वजन वाढण्याची चिंता न करता खाऊ शकता. 

भात किती आणि कधी खाऊ शकतो.

कोणताही पदार्थ प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्याने त्याचे दुष्परिणाम हे दिसतातच. त्याचप्रमाणे भातही प्रमाणात खाल्ल्यास त्यातून पोषण मिळेल आणि वजन वाढणार नाही.

सहसा भात दुपारच्या जेवणात खावा. काही वेळेस सीमित प्रमाणात तुम्ही रात्रीदेखील भात खाऊ शकता. जेवणात तुम्ही एक वाटी भात दररोज खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()