तुमची मुलं रात्री अंथरुणात लघवी करतात का? जाणून घ्या कारणं अन् उपाय

जर ७ वर्षाच्या वयानंतरही तुमचं मुल अंथरुणात लघवी करत असतील डॉक्टरांचा घ्या सल्ला
Does your child have problem of  Child Bed Wetting, know the cause, the solutions
Does your child have problem of Child Bed Wetting, know the cause, the solutions
Updated on

Child Bed Wetting: बहूतके लहान मुलं रात्री झोपेत(Sleep) अंथरुणामध्ये लघवी (Bed Wetting) करतात, या त्रासाला Bed wetting म्हटले जाते. रात्री गाढ झोपेमध्ये असताना मुलांना आपोआप लघवी(Urine) होते, त्यामुळे कित्येक पालकांना (Parents) मुलांची काळजी वाटत असते. लहान वयामध्ये मुलांमध्ये (Toddler) अशा समस्या होत असतात पण पालकांनी त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. मुलांना लघवी नियंत्रित करण्याचे योग्य प्रशिक्षण न मिळल्यास असे होऊ शकते. मुलांच्या जडण-घडणीमधील ही सामान्य गोष्ट आहे. (Does your child have problem of Bed wetting, know the cause, the solutions)

कित्येकदा लहान मुलं गाढ झोपेमध्ये अंथरुणामध्ये लघवी करतात. काही मुलं भयानक स्वप्न पडतात त्यामुळे बेडवरच लघवी करतात. ७ वर्षाच्या आतील मुलं रात्री अंथरुण ओलं करत असतील तर चिंता करण्याचे कारण नाही. या वयामध्ये रात्री लघवी नियंत्रणात ठेवण्यासाठी मुलं हळू हळू शिकतात पण तुमचं मुलं ७ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असेल तरीही अंथरुणात लघवी करत असेल तर तुम्हाला या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुलांचा हा त्रास समजून घेऊन त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असते, त्यामुळे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Does your child have problem of  Child Bed Wetting, know the cause, the solutions
10वी, ITI पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी; ८१००० पगार, लवकर भरा अर्ज
Does your child have problem of  Child Bed Wetting, know the cause, the solutions
Does your child have problem of Child Bed Wetting, know the cause, the solutions

मुलं अंथरुणात लघवी का करतात? (Why child have problem of Bed wetting)

  • रात्री लघवी रोखण्यासाठी तुमच्या मुलांचे मुत्रायश विकसित झाले नाही असेही असू शकते.

  • जर मुत्राशय निंयत्रित करणाऱ्या नसांचा विकास होत असेल तर लघवी आल्यास मुलांची झोप मोड होते. गाढ झोपेत असल्यावर असे घडू शकते.

  • लहान मुलांमध्ये रात्रीच्या वेळी लघवी न करण्यासाठी, काही मुलांच्या शरीरामध्ये लघवी रोखण्यासाठीचे पुरेसे हॉर्मोन नसतात.

  • मुत्रमार्गामध्ये संक्रमणामुळे देखील मुलांना लघवी नियंत्रणामध्ये ठेवण्यास त्रास होऊ शकतो.

  • स्लीप एप्नियामध्ये झोपेमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो, ज्यामुळे कधी कधी झोपेमध्ये लघवी होऊ शकते.

  • मधूमेह, दिर्घकाळ बद्धकोष्ठता, मूत्रमार्ग किंवा मज्जासंस्थेच्या संरचनेत समस्येमुळे लहान मुलं अंथरुणामध्ये लघवी करू शकतात.

Does your child have problem of  Child Bed Wetting, know the cause, the solutions
Does your child have problem of Child Bed Wetting, know the cause, the solutions
Does your child have problem of  Child Bed Wetting, know the cause, the solutions
Promise Day का साजरा करतात? पार्टनरला द्या 'हे' ५ वचन नातं होईल सुंदर

जर तुमचं मुल रात्री झोपेत अंथरुणामध्ये लघवी करण्याची सवय असेल काही उपाय करून ही समस्या सोडविता येऊ शकते.

  • बाथरुम झोपण्याच्या खोलीपासून खूप दूर नसले पाहिजे.

  • मुलांना रात्री जाण्याची भिती वाटणार नाही अशा ठिकाणी बाथरुम असले पाहिजे.

  • जर मुलांना रात्री उठून टॉयलेटला जाण्यास भिती वाटत असेल तर त्यांना तुम्हाला सोबत घेऊन जायला सांगा

  • रात्री खोलीमध्ये एक छोटा बल्ब नेहमी चालू ठेवा

  • मुलांना पुरेसे पाणी आणि इतर द्रव्य पदार्थ पिण्यासाठी द्या. दिवसा जास्त पाणी पिऊ द्या, त्यामुळे रात्री कमी लघवी होते.

  • मुलांना लघवी करण्याचे योग्य प्रशिक्षण द्या.

Does your child have problem of  Child Bed Wetting, know the cause, the solutions
बुरखा, नकाब, हिजाब यांच्यातील फरक माहितीये का?

डॉक्टरांकडे केव्हा जावे?

जर तुमच्या मुलांचे वय ७ पेक्षा जास्त असूनही अंथरुणामध्ये लघवी करत असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा

रात्री लघवी करताना त्रास होत असेल किंवा खूप तहान लागत असेल, गुलाबी किंवा लाल रंगाची लघवी होत असेल किंवा घोरण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.