Donkey milk : जगात सर्वात महागडं गाढविणीचं दूध असतं; काय आहे याचं महत्त्व, जाणून घ्या...

Donkey milk benefits for skin: या दूधापासून बनणाऱ्या चीजची किंमत ७० हजार रुपये आहे.
donkey milk benefits in Marathi
donkey milk benefits in MarathiSakal
Updated on

Donkey Milk Benefits: राणी क्लिओपात्राबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. ती म्हणजे गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची आणि म्हणूनच ती कायम तरुण राहत होती, तिची त्वचा चांगली राहत होती. पण खरंच गाढविणीचं दूध इतकं फायदेशीर आहे का? जाणून घ्या त्याचं महत्त्व...

कोणत्या गाढविणीचं दूध लोकप्रिय?

केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार मनेका गांधींनी या गाढविणीच्या दुधाचं कौतुक केलं. हे दूध अत्यंत महाग विकलं जातं. या दूधापासून साबण, चीज तयार केलं जातं.

सौराष्ट्रात जामनगर व द्वारका इथं आढळणाऱ्या हलारी जातीच्या गाढविणीचं दूध गुजरातमध्ये लोकप्रिय आहे. एक विशेष समुदाय या जातीच्या गाढवांचं पालनपोषण करतो, दूध काढतो. या दूधाची एका लिटरची किंमत ७००० रुपये आहे.

donkey milk benefits in Marathi
Baba Kalyani : कोट्यवधीच्या कंपनीचे मालक पण भावा बहिणीचा वाद सुटेना! भारत फोर्जचे बाबा कल्याणी अडचणीत

या जातीच्या गाढविणीची उंची सामान्य असून बांधा मजबूत असतो. उत्तर सर्बियामध्ये गाढविणीच्या दूधापासून चीज तयार केलं जातं.

या चीजची एका किलोची किंमत सुमारे ७० हजार रुपयांपर्यंत आहे. सर्बियन टेनिसस्टार नोवाक जोकोविचलाही हे चीज पुरवलं जातं, ही गोष्ट समोर आल्यानंतर हे चीज चर्चेत आलं आहे. (Health News)

ही गाढवीण एका दिवसात एक लीटरही दूध देत नाही, त्यामुळे यापासून तयार होणारं चीज व पनीर कमी असतं. एका वर्षात या दूधापासून ६ ते १५ किलो पनीर तयार होतं.

उत्पादन कमी असल्याने त्याची किंमत खूप जास्त आहे. गाढविणीच्या दूधापासून तयार केलेल्या जगातल्या सर्वात महागड्या चीजला प्युल चीज म्हणतात.

donkey milk benefits in Marathi
Success Story : चालता चालता शूजमधून होईल वीजनिर्मिती; नववीच्या विद्यार्थ्याचा अनोखा शोध

काय आहेत फायदे?

- आतड्यांचे संसर्ग कमी करते.

- डोकेदुखीसाठी फायदेशीर

- ऑस्टिओपोरोसिससाठी उपयुक्त

- रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

- केस आणि सौंदर्यासाठी फायदेशीर

- नॅचरल मॉईश्चरायझर म्हणून काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.