Corn Silk Benefits: मक्याचे केस फेकून देत असाल तर आधी हे फायदे जाणून घ्या

मक्यासोबत हे कॉर्न सिल्कदेखील आरोग्यासाठी फायद्याचे
Corn Silk Benefits
Corn Silk Benefits
Updated on

मका अन् त्यातल्या त्याच म्हणजे स्वीट कॉर्न....पावासाळ्यात स्वीट कॉर्न मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात. पावसाळ्यातील फ्रेश मक्याचा कणीस खाण्याची मजा काही वेगळीच आहे. मक्याचे अनेक पदार्थ घराघरात तयार केले जातात. कोणाला भाजलेला लिंबू लावलेला मका खायला आवडतं तर कोणाला मक्याचे दाणे उकळून किंवा त्याची भजी आवडते. हा आवडीनं खाणाऱ्या मक्याचे अनेक फायदे आहेत.

बहुतांशजण मका खाताना त्याच वरच आवरण काढताना त्याला असलेलं केस म्हणजे कॉर्न सिल्क फेकून देतात. तुम्हीदेखील असं केलंच असेल. पण कधी विचार केला आहे का? या कॉर्न सिल्कबद्दल. तर आता फेकण्याआधी कॉर्न सिल्कचा विचार नक्की करा. कारण मक्यासोबत हे कॉर्न सिल्कदेखील आरोग्यासाठी फायद्याचे आहे.

Corn Silk Benefits
Health: नाकात नथ घालण्याचा अन् महिलांच्या गर्भाशयाचा आहे थेट संंबंध

स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. याशिवाय यामध्ये असलेले फायबर्स पचनक्रिया सुधारतात आणि फायटोकेमिकल्स अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.

तर त्याचे केस म्हणजेच कॉर्न सिल्क हे पोटॅशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे B2, C आणि K सारख्या मुख्य पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हे अनेक आजरांवर उपयुक्त आहेत.

कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित राहतं. तर जाणून घेऊयात कॉर्न सिल्कचे फायदे.

मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते

कॉर्न सिल्कमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीराचे कार्य चांगले राहते. विशेषतः यामध्ये इंसुलिन हार्मोन नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे मधुमेह असल्यास’ रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Corn Silk Benefits
Health Tips : लैंगिकतेबद्दल मुलांशी केव्हा बोलावे? नातेसंबंध, प्रेम, आकर्षण, वासना यावर पालकांनी का चर्चा करावी?

किडनीची समस्या दूर होते

किडनीच्या समस्येवर अनेक उपाय करुन थकला असेल तर हा एक घरगुती उपाय करा ज्याच्यामुळं ही समस्या दूर होईल. त्यासाठी तुम्ही कॉर्न सिल्कचा वापर करू शकता. याने यूटीआय, ब्लेडर, इन्फेक्शन, किडनी स्टोन, यूरिनरी सिस्टममध्ये सूज येणे अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

कॉर्न सिल्कमध्ये कॅलरी कमी असतात, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. यापासून तयार चहा सेवन केल्याने लवकर भूक लागत नाही. पोट भरलेलं राहतं आणि याने शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते.

Corn Silk Benefits
Health Care Tips : घराच्या घरी व्यायाम करा अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा! जाणून घ्या

पचनक्रिया चांगली राहते.

कॉर्न सिल्कने पचनक्रिया चांगली राहते. काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मक्याचे हे धागे लिवर द्वारे बाइल सेक्रेशनला वाढवतात. बाइल गालब्लेडरमध्ये एकत्र होतात, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होतं.

व्हिटामीन सी

कॉर्न सिल्क आपण न वापरता फेकून देतो, पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असत. हे एक चांगलं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे. कार्डियोवस्कुलर रोगापासून याने बचाव होण्यास मदत मिळते. तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो.

त्वचेच्या समस्या दूर होतात

कॉर्न सिल्कने त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. खरचटणे, पिंपल्स, खाज, किटक चावणे यापासून आराम मिळतो. यातील अ‍ॅंटीबॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी सेप्टीक गुण त्वचेची रक्षा करतात.

तर या कॉर्न सिल्कचा वापर कसा कराल

कॉर्न सिल्क खाण्याची कोणतीही पद्धत नाहीये. त्यामुळं तुम्ही त्याचा चहा बनवु शकता. एका भांड्यात पाणी उकळा आणि त्यात ताजे कॉर्न सिल्क टाका. काही मिनिटे हे चांगलं उकळू द्या आणि थंड होऊ द्या. काही वेळाने या चहाला भुरका रंग येईल. त्यानंतर हा चहा गाळून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.