शरीरशास्त्र : मधुमेह व हाडाचे आरोग्य

जगात भारताला मधुमेह रुग्णांची राजधानी म्हणून ओळखले जाते. मधुमेह हा इतर अवयवांवर परिणाम करतो त्यापैकी हाडाचे व मधुमेहाचे असणारे नाते समजून घेऊयात.
diabetes and bone health
diabetes and bone healthsakal
Updated on

- डॉ. अजय कोठारी, डॉ. सिंपल कोठारी

जगात भारताला मधुमेह रुग्णांची राजधानी म्हणून ओळखले जाते. मधुमेह हा इतर अवयवांवर परिणाम करतो त्यापैकी हाडाचे व मधुमेहाचे असणारे नाते समजून घेऊयात. मधुमेह झालेल्या व्यक्तीची शर्करा नियंत्रित नसल्यास हाडाच्या आरोग्यावर आणि साधनांवर परिणाम होतो. हे विकार एखाद्या वाळवीसारखे आहे. लवकर लक्षात येत नाही. लक्षात येते तोवर परिणाम झालेला असतो व आपण त्यावर जास्त उपचारही करू शकत नाही. म्हणून मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासण्या करणे व लवकर त्यावर उपाययोजना करणे आरोग्यासाठी चांगले ठरते.

१) हाडाची ठिसुळता वाढते

हे आपण डेक्सा स्कॅन या सध्या तपासणीने निदान करू शकतो व त्यानुसार पुढील उपाययोजना करावी. कारण आपण योग्य उपचार घेतले नाही तर हाडाचे विच्छेदन (फ्रॅक्चर) होण्याचे प्रमाण वाढते आणि असे घडल्यास कायमचा हाडाचा त्रास आपणास सोसावा लागतो.

२) पायांवर परिणाम

मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांना अनेक आजाराने सामोरे जावे लागते. कधीकधी एखादे हाड, अवयव कापावा लागते. हे साधारण मज्जा संस्थेवर परिणाम झाल्याने संवेदनाच्या अभावी जखम होऊन ती वाढत जाते. रक्त वाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होऊन ‘डायबिटीज फुटची सुरूवात होते. कधी एक बोट किंवा दोन तर कधी पूर्ण पायही कापावा लागतो.

३) हाडाच्या जखमा

हाडाच्या जखमा किंवा असलेले जंतू संस्करण लवकर आटोक्यात येत नाही त्यासाठी बरेच काळ उपचार लवकर घ्यावे लागते.

४) सांधे निकामे होणे

सांधे कमकुवत होऊन चालण्यात अचानक बेढबपणा येतो. किंवा अचानक पडून फ्रॅक्चर होण्याचे प्रमाणे वाढते. साध्यांना सूज येऊ शकते. याला चारकांट (Charchot Joint) म्हणतात.

५) गोठलेला खांदा

२० टक्के मधुमेह लोकांना हा आजार होऊ शकतो यामध्ये खांद्याचा भाग दुखतो किंवा खांद्याची हालचाल पूर्णपणे करता येत नाही खांद्याच्या कडक होतो.

आता प्रश्न पडला असेल की, आपण हाडाचे आरोग्य कशा प्रकारे चांगले ठेवू शकतो?

उपाययोजना

पायाला किंवा शरीरातील कोणत्याही भागास जखम झाल्यास त्यावर ताबडतोब उपाययोजना करावी. पादत्राणांमध्ये बदल करावा. पायाला रक्तपुरवठा वाढविणाऱ्या औषधे घ्यावीत. पायाची व हाताच्या जखमेची काळजी घ्यावी.

गोठलेला खांदा

याला व्यायाम महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी-१२, डी-३ घेणे आवश्यक आहे.

डायबेटिक नॅरोपॅथी

साखर नियंत्रणात ठेवणे, नसांची तपासणी करणे, नियमित व्यायाम करणे, औषधोपचार घेणे आवश्यक आहे. जीवनशैलीमध्ये बदल करून आपण हा आजार रोखू शकतो.

व्यायाम

दररोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे. यामध्ये सायकलिंग, पोहणे, योगासने करणे आवश्यक आहे. त्यामुळे साखर नियंत्रित होऊन हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये लवचिकता आणते.

आहार

यासाठी डायटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मैदा, बेकरी पदार्थ, दूध, दुग्धजन्य पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करावे. आहारात पालेभाज्या, फळे (सफरचंद, मोसंबी, संत्र), कडधान्यांचा तसेच गव्हाऐवजी बाजरी, ज्वारी, नाचणी सत्त्व यांचा समावेश असावा.

खालील गोष्टी बऱ्याच प्रमाणे उपयोगी तुम्हाला ठरतील.

१ शर्करा नियंत्रित ठेवणे - प्रत्येक व्यक्तींनुसार एक लक्ष श्रेणी (Tanget Range) ठरविलेले आहे. त्याप्रमाणे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

२ सकस समतोल नियमित आहार व्यायाम योगासने करावीत. दारू व धूम्रपान टाळावे.

३ महत्त्वाचे म्हणजे नियमितपणे पुढील तपासणी करावी.

अ) शर्करा HbA1C

ब) हाडांसाठी Dexa Scan

क) नसांसाठी Nerve Study-NCV

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.