शरीरशास्त्र : पाठीच्या कण्याची काळजी...

आपण गेल्या आठवड्यात कोरोनानंतर पाठीचे दुखणे कसे उद्‍भवते याची माहिती घेतली. अनेक व्यक्तींचे वर्क फ्रॉम होम अजून सुरू असले तरी आपण काही प्रमाणात घरीही योग्य काळजी घेऊ शकतो.
Spinal cord care
Spinal cord caresakal
Updated on
Summary

आपण गेल्या आठवड्यात कोरोनानंतर पाठीचे दुखणे कसे उद्‍भवते याची माहिती घेतली. अनेक व्यक्तींचे वर्क फ्रॉम होम अजून सुरू असले तरी आपण काही प्रमाणात घरीही योग्य काळजी घेऊ शकतो.

आपण गेल्या आठवड्यात कोरोनानंतर पाठीचे दुखणे कसे उद्‍भवते याची माहिती घेतली. अनेक व्यक्तींचे वर्क फ्रॉम होम अजून सुरू असले तरी आपण काही प्रमाणात घरीही योग्य काळजी घेऊ शकतो.

कामाची जागा कशी असावी

  • कामासाठी वापरली जाणारी खुर्ची पाठीला योग्य तो आधार देणारी असावी.

  • लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर असावा.

  • खुर्चीवर बसल्यानंतर गुडघा आणि खुब्यामध्ये ९० अंशाचा कोन होऊन पाय जमिनीला टेकलेले असावेत.

  • हात टेबलवर व्यवस्थित टेकलेले असावेत.

  • खूप मऊ सोफा, गादी यावर काम करायला बसू नये.

  • एकाच स्थितीमध्ये खूप वेळ काम करायला बसू नये.

  • आपल्या मानेची आणि पाठीची स्थिती काम करताना कशी आहे याबद्दल जागरूक रहा. मानेच्या आणि पाठीच्या स्नायूंवर खूप जास्त वाकून एकाच स्थितीमध्ये काम केल्यास त्यावर ताण येऊन इजा होऊ शकते.

  • कामामध्ये विश्रांती घेऊन शरीराची स्थिती बदलणे (उदा - खुर्चीवर बसले असल्यास उभे राहणे, थोडे चालून येणे.)

  • खूप थकवा येईल असे व्यायाम करू नयेत.

  • योग्य ते व्यायाम अथवा योगासने करावयाचे असल्यास त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • पाठीला वेदना झाल्यास सोपी उपाययोजना म्हणून गरम पाण्याचा शेक, स्नायूंना योग्य ती विश्रांती देणे आवश्यक आहे

  • वरील दिलेली काही लक्षणे जाणवल्यास फिजिओथेरपिस्ट तुम्हाला मदत करू शकतात.

फिजिओथेरपिस्ट तुम्हाला कोणती मदत करू शकतात.

  • पाठीच्या वेदनेचे परिमाण जाणून घेणे

  • शरीराची ठेवण जाणून घेणे

  • स्नायू , सांधे यांच्या ताठरपणा आणि ताणाच्या समस्येचे मूल्यांकन करणे.

  • फिजिओथेरपिस्ट तुम्हाला वेदना, शरीराची ठेवण, पाठ आणि शरीराच्या हालचाली याबद्दल जागरूक करतात. तुम्हाला व्यायामाचा एक संच तुम्हाला ठरवून दिला जाईल. तो तुमच्या समस्याच कमी करायला मदत करेल इतकेच नव्हे तर तुमच्या पाठीच्या कण्याला अधिक सुदृढ बनवायला मदत करेल. मॅन्युअल थेरपी आणि काही सक्रिय व्यायाम देऊन तुमच्या वेदना आणि शरीराची ठेवण सुधारण्यास मदत करतील.

डॉक्टर तुम्हाला कसे मदत करू शकतात.

  • ज्या रुग्णांमध्ये तीव्र वेदना यासारखी प्रगत लक्षणे आहेत, आणि ज्यांना औषधे आणि फिजिओथेरपी करूनही आराम मिळत नाही त्यांना पेन ब्लॉक (इंजेक्शन) थेरपीची गरज भासू शकते. ज्याद्वारे नसांवरील सूज कमी होऊन वेदना कमी करण्यास मदत होते.

  • नंतरच्या टप्यात स्नायूंमधील ताकद कमी झाल्यास, लघवी आणि मल विसरीत करण्यास त्रास होऊ लागल्यास की-होल स्पाईन सर्जरी करण्याची आवश्यकता भासू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.