मनाची शक्ती : आनंदी हार्मोन्स कसे वाढवायचे?

सेरोटोनिन, डोपामाइन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन यांसारखे संप्रेरक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि म्हणून त्यांना ‘आनंदी संप्रेरक’ असेही म्हणतात.
hormone
hormonesakal
Updated on

- डॉ. हंसा योगेंद्र

सेरोटोनिन, डोपामाइन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन यांसारखे संप्रेरक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि म्हणून त्यांना ‘आनंदी संप्रेरक’ असेही म्हणतात.

आपण आज जीवनशैलीतील आनंदी हार्मोन्स वाढवू शकणाऱ्या काही घटक आणि क्रियांची माहिती घेऊयात.

१) व्यायाम

कोणत्याही प्रकारचा व्यायामामुळे हृदयाची गती वाढते. ती तुमच्या शरीरात आणि मनाला सकारात्मक भावना निर्माण करते. कारण शारीरिक क्रियेमुळे एंडोर्फिनची निर्मिती वाढते. शरीरात तणाव किंवा वेदना निर्माण झाल्यावर एंडोर्फिन हे हार्मोन्स स्त्रवते. हे हार्मोन्स तणाव आणि वेदना कमी करून तुम्हाला बरे वाटण्यास मदत करतात. दररोज अर्धा तास नियमित व्यायाम केल्याने आनंदी मूडमध्ये राहाल. हायकिंग, सायकलिंग, वेगवान चालणे किंवा फुटबॉल किंवा क्रिकेट यासारखे खेळ खेळता येईल. एकट्याने व्यायामा करण्यापेक्षा समुहाने केलेल्या व्यायामामुळे एंडोर्फिन अधिक निर्माण होते.

२) निसर्गात वेळ घालवा

जुन्या काळात अन्न गोळा करण्यासाठी, पाणी आणण्यासाठी, प्राण्यांना सांभाळण्यासाठी लोक बराच वेळ घराबाहेर घालवायचे. निसर्ग मातेच्या संपर्कात मानव जगत होता. ताज्या नैसर्गिक हवेत श्वास घेतल्याने, तुमच्या मेंदूतील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि सेरोटोनिन वाढते, जो तुमचा मूड बदलतो. दररोज किमान १५ मिनिटे निसर्गाच्या सहवासात घालवण्याचा प्रयत्न करा आणि ताजी हवा आणि सूर्यप्रकाश घ्या. तुम्हाला त्याच त्या शेजारच्या लहान उद्यानात जाण्याचा कंटाळा आला असल्यास आठवड्याच्या शेवटी सुट्टी घ्या आणि टेकड्या किंवा समुद्रकिनाऱ्यांकडे जा.

३) दयाळूपणा दाखवा आणि कृतज्ञ व्हा

इतरांप्रती दयाळूपणा दाखवल्याने शरीराला ऑक्सिटोसिन सोडण्यास प्रवृत्त करते. ते तणाव कमी करणारे संप्रेरक आहे. या संप्रेरकाला कधीकधी ''प्रेम संप्रेरक'' देखील म्हटले जाते. कारण ते शारीरिक स्नेह, विश्वास, बंधन आणि सहानुभूतीच्या जवळिकीमुळे वाढते. त्याचप्रमाणे आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा मेंदू डोपामाइन आणि सेरोटोनिन सोडतो. या दोन महत्त्वाच्या न्यूरोट्रांसमीटरमुळे आपल्याला लगेच बरे वाटते आणि उत्साह निर्माण होतो.

४) हसणे

हसणे डोपामाइन आणि एंडोर्फिनचे स्तर वाढवते. कोणत्याही तणाव आणि चिंतापासून मुक्त होण्यासाठी त्वरित मूड बदलला जातो.. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत चांगल्या विनोदाच्या क्षणांचा आनंद घेतल्याने ऑक्सिटोसिनची पातळी वाढते. ऑक्सिटोसिन हायपोथालेमसमध्ये तयार होते आणि पिट्यूटरी ग्रंथीद्वारे रक्तप्रवाहात सोडले जाते. तुम्ही उजव्या हाताचे असाल तर डाव्या हाताने बॅडमिंटन खेळा. ही साधी क्रिया देखील हशा वाढवते. बरं, हसण्याने तुमच्या समस्या सुटणार नाहीत, परंतु त्यामुळे तुमचे जीवन सुखकर होईल. तणाव आणि नैराश्यावर मात करण्यासाठी लाफ्टर थेरपी प्रभावी असल्याचेही संशोधनात म्हटले आहे.

५) ध्यान करा

झोप आणि एकाग्रता सुधारण्यापासून ते चिंता कमी करण्यापर्यंत ध्यानाचे अनेक फायदे आहेत. नियमितपणे ध्यानाचा सराव करतात ते प्रत्येक बैठकीनंतर स्वतःला शांतता आणि शांततेच्या जागेत शोधतात. हे त्यांच्या प्रणालीमध्ये डोपामाइन, सेरोटोनिन, मेलाटोनिन आणि एंडोर्फिन सारख्या हार्मोन्स आणि न्यूरोट्रांसमीटरच्या वाढीमुळे आहे. आरामदायी ठिकाणी शांतपणे बसणे हे साधे ध्यान तंत्र आहे. सर्व सकारात्मक आणि नकारात्मक विचार येऊ द्या आणि जाऊ द्या. निरीक्षण करा. श्वासाकडे लक्ष द्या. हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा.

तुमच्या आनंदी संप्रेरकांना नैसर्गिकरित्या चालना देण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम, निसर्गात वेळ घालवणे, दयाळू आणि कृतज्ञ असणे, हसणे आणि ध्यान करणे, या पाच सोप्या क्रिया निवडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.