- डॉ. हंसा योगेंद्र
यकृत हा आपल्या शरीरातील सर्वांत मोठा अवयव आहे. हा अवयव रक्ताचे शुद्धीकरण करून आणि पचनास मदत करतो. यकृत विषारी पदार्थ जमा करत नाही, ते फक्त विष बाहेर टाकू शकते. अल्कोहोलचे अतिसेवन, प्रमाणापेक्षा जास्त औषधे घेणे, जास्त उष्मांकयुक्त आहार आणि संसर्गामुळे यकृताच्या कार्यावर परिणाम होतो. त्याच्या कार्यक्षम कार्यासाठी काही मार्ग आहेत, ज्याद्वारे यकृत खराब होण्यापासून वाचवू शकता.
हळद
हळदीमुळे यकृताचा दाह बरा होऊ शकतो. त्याचबरोबर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता हळदीमध्ये आहे. त्यामुळे यकृताच्या पेशींवरील भार कमी होतो. एकतर झोपण्यापूर्वी हळदीच्या दुधाचे सेवन करा किंवा सकाळी लवकर कोमट पाण्यात चिमूटभर हळद टाकून प्यावे.
लसूण
लसणातील सल्फर संयुगे यकृतातील अग्नी सक्रिय करतात. ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. त्यात ॲलिसिन आणि सेलेनियमसारखी संयुगे जास्त प्रमाणात असतात. ती यकृताला कोणत्याही विषारी पदार्थापासून वाचवण्यास मदत करतात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या दोन पाकळ्या खाव्यात किंवा तुम्ही स्वयंपाक करताना लसणाचा योग्य वापर करू शकता.
योग्य आहाराची सवय पाळा
आयुर्वेदानुसार, शरीरातील चयापचय आणि पचन विविध प्रकारच्या पाचक अग्नीद्वारे चालते. आयुर्वेदात त्यांना ‘अग्नी’ आणि ‘पित्त’ म्हणतात. यकृत अग्नी प्रकृतीचे असल्यामुळे कोणतीही उष्ण गोष्ट त्यासाठी चांगली नसते. अल्कोहोल, कॅफिन, तंबाखू, गरम मसालेदार अन्न, मांसाहार, प्री-पॅकेज केलेल्या पदार्थांमधील रसायने किंवा जड औषधे यकृतासाठी चांगली नाहीत, कारण ते सर्व अग्निमय असतात.
आयुर्वेदात, कडू चव आणि थंडगार औषधी वनस्पती, त्याचबरोबर कोरफड, कडुनिंब, कुटकी, कारले, आवळा, हळद, भुई-आवळा यांसारखे पदार्थ यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जातात.
सॅच्युरेटेड फॅट्स किंवा ट्रान्स फॅट्स जास्त असलेले पदार्थ टाळा; कारण त्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकते. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेये टाळा. कारण त्यात ट्रान्स फॅट्स असतात. तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, तर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करा. बदाम, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, अक्रोड, ॲवाकॅडो यांसारख्या चांगल्या चरबीचे अधिक सेवन करा.
फायबरसाठी अधिक फळे आणि भाज्या खा. फायबरमुळे तुमच्या यकृतावरील ताण कमी होतो. विशेषतः पालक आणि मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. हिरव्या पालेभाज्यांमधील संयुगांमुळे नैसर्गिकरीत्या सर्व प्रणाली अधिक क्षमतेने कार्य करते. बीटरूट्स, गाजर आणि सफरचंद देखील यकृतासाठी चांगले आहेत.
योगासने
तुमच्या यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योगासने तंत्र हे उत्तम माध्यम आहे. येथे काही आसनांची नावे देत आहे. यकृताचे आणि पर्यायाने शरीराचे कार्य सुधारण्यासाठी ती दररोज करणे आवश्यक आहेत. ही आसने यकृतातील अतिरिक्त चरबीदेखील काढून टाकू शकतात
योग मुद्रा
भुजंगासन
धनुर्वक्रासन
पश्चिमोत्तनासन
सूर्यनमस्कार
डायाफ्रामॅटिक श्वासोच्छवासासारखा प्राणायाम नियमितपणे केला पाहिजे.
यकृताच्या समस्येचे एक प्रमुख कारण म्हणजे मद्यपान. मद्यपानामुळे तुमच्या यकृताच्या पेशींना कायमचे नुकसान होते. त्यामुळे मद्यपान पूर्णपणे टाळावे.
सक्रिय जीवन जगा. दररोज किमान ५ ते ६ किलोमीटर चालण्याचा व्यायाम करा. शरीर सक्रिय होण्यासाठी तो उत्तम व्यायाम आहे.
योगाभ्यास करा आणि योग्य आहाराच्या सवयी पाळा.
हे सर्व केल्याने तुमचे यकृत निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.