- डॉ. कोमल बोरसे
आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफित मोकळ्या केसांत ग
आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग
पावसाळा सुरू झाला की सर्वच हॉस्पिटल पूर्ण भरलेले दिसतात. म्हणजेच, डेंग्यू, टायफॉईड, न्युमोनिया, जुलाब, उलट्या, सर्दी, ताप या आजाराने त्रस्त झालेले रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात.
कारण पावसाळा सुरू होताच रस्त्यावरील पाणीपुरी, भजी, चहा, वडापाव, खाण्याची जणू प्रथाच आहे, आता हे पदार्थ खाऊन सगळेच आजारी पडतात असं नाही परंतु ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. त्यांनी या सगळ्यापासून स्वतःला दूरच ठेवायला हवे आणि खाली दिलेले पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करावे.
हे पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतील. चार महिन्यांच्या कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा हा स्वागतार्ह बदल आहे. तथापि, मॉन्सून उष्णतेपासून दिलासा देत असताना, तो आरोग्याच्या जोखमींसह येतो. हवामानातील बदलांमुळे (तापमान आणि आर्द्रता) काही रोगांचा प्रादुर्भाव या ऋतूत लक्षणीयरीत्या सुलभ होतो.
परिणामी, संक्रमण, पचन समस्या आणि ॲलर्जी अधिक सामान्य असल्याचे दिसून येते. परंतु काही सावधगिरी आणि निरोगी आहाराचे पालन करून या ऋतूचा भरपूर आनंद लुटण्याचा नेहमीच एक मार्ग असतो. निरोगी राहून पावसाचा आनंद लुटायचा असल्यास खालील पदार्थांचा आहारात समावेश करा.
१. सूप - तुम्हाला भूक लागली असल्यास रस्त्याच्या कडेला असलेल्या चहा, वडापाव, समोसा, भजी खाण्यापेक्षा वाफळलेले गरम सूप वापरून पिऊन पहा. पोषकतत्त्वांनी भरलेले आणि घरी बनवलेले फ्रेश सूप पचायला सोपे असतात आणि पोटाला कोणताही त्रास होत नाही.
एक वाटी चिकन किंवा भाज्यांचे सूप, स्वीट कॉर्न सूप, काळी मिरी, लसूण, आले आदी इत्यादी पदार्थ घालून बनवलेले सूप तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवते. वातावरणातील थंडीमध्ये शरीरातून गरम ठेवण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते. भाज्या आणि चिकनसोबत आपण कडधान्याचेही सूप बनवू शकतो. कुळीथ किंवा हुलग्याचे, तुरीच्या डाळीचे, हिरव्या वाटाण्याचे सूप प्रथिनयुक्त असतात.
२. जांभूळ/मनुका - जांभूळ आणि मनुका यासारखी फळे तुमच्या रोजच्या आहाराचा भाग असावीत. जांभळला गोड परंतु किंचित तुरट चव आहे. जांभळाच्या रसामध्ये बायोॲक्टिव्ह फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे यकृत रोगांचा धोका कमी होतो. हे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले असतात. पुढील लेखात आहारात आणखी कशाचा समावेश करायची याची माहिती घेऊयात.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.