आरोग्यमंत्र : मधुमेहाच्या चाचण्यांचा मथितार्थ

आपल्याला मधुमेह किती आटोक्यात आहे हे जाणून घ्यायचे असल्यास ‘एचबीए१सी’ तपासणी करणे उपयोगी ठरते.
Diabetes Test
Diabetes TestSakal
Updated on

- डॉ. सिंपल कोठारी

एचबीए१सी किंवा ग्लाइकेटेड हिमोग्लोबिन म्हणजे काय?

ही रक्तचाचणी असून रक्तातील तीन महिन्यातील ग्लुकोजची पातळी दर्शवते. मधुमेह आणि प्रीडायबेटिसचे निदान आणि व्यवस्थापनासाठी ही उपयुक्त आहे.

‘एचबीए१सी’ चाचणी कोणाला उपयोगी आहे?

- ही चाचणी सगळ्याच प्रौढ लोकानी केली पाहिजे.

१) टाइप-१ मधुमेह असलेल्यांना वर्षातून किमान ३-४ वेळा करावी.

२) टाइप-२ मधुमेह असलेल्यांनी वर्षातून २ ते ३ वेळा करावी.

३) पूर्वमधुमेह असलेल्या व्यक्तीने दरवर्षी किमान तपासणी करावी.

४) मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तीस वय, कौटुंबिक इतिहास, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, पीसीओडी इत्यादीपासून मूलांकनानूसार चाचणी करावी.

५) अस्पष्ट लक्षणे असलेले लोक, जास्त तहान किंवा भूक लागणे, रात्री वारंवार लघवी होणे, प्रयत्न न करता वजन कमी होणे, अंधूक दृष्टी, मुंग्या येणे, जखम व फोडे लवकर बरे न होणे, अत्यंत थकवा, जास्त आजारी पडणे.

‘एचबीए१सी’ चाचणी उपाशीपोटी करण्याची गरज नसते का? आणि का?

हिमोग्लोबिनद्वारे शरीरातील पेशींमध्ये रक्तातील ऑक्सिजन पोहोचवतो. ग्लुकोज हिमोग्लोबिनच्या रेणूशी बांधले जाते तेव्हा ग्लायकेटेड हिमोग्लोबिन ‘एचबीए१सी’ असे संबोधिले जाते.

लाल रक्तपेशींचा कालावधी साधारण २ ते ३ महिने असल्याने ‘एचबीए१सी’ केल्याने मागील २ ते ३ महिन्यांची साखरेची सरासरी काढता येतो. म्हणून ही तपासणी उपाशीपोटी करण्याची गरज नसते.

मी ‘एचबीए१सी’ची तपासणी करू का? की फक्त रक्तातील शर्करातपासणी?

रक्तातील शर्करा ही मागील ८ ते १२ तासात आपण सेवन केलेल्या अन्नावर अवलंबून असते. आपल्याला मधुमेह किती आटोक्यात आहे हे जाणून घ्यायचे असल्यास ‘एचबीए१सी’ तपासणी करणे उपयोगी ठरते. शिवाय आपण नेमक्या कोणत्या श्रेणीत आहोत, म्हणजे पूर्वमधुमेह का मधुमेह, हे निदान करणे सोपे जाते व पुढील उपाययोजना करण्यास मदत होते.

रक्तातील शर्करा तपासणीने आपणास एखाद्या पदार्थाने शर्करा वाढते का ते जाणून घेण्यास मदत होईल.

‘एचबीए१सी’ चाचणी करण्याचा डॉक्टर आग्रह का करतात?

‘एचबीए१सी’ जेवढे आटोक्यात ठेवले तेवढे मधुमेहामुळे दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम कमी जाणवतात, हे अनेक संशोधनाने सिद्ध झाले आहे. डॉक्टरांना त्यानुसार औषधांमध्ये बदल किंवा नवीन औषध सुरू करायची गरज आहे का ते ठरविता येते. अनेकदा रुग्ण नेहमीची मधुमेहाची औषध न घेता शर्करा चाचणी करतात (दोन तासांनी) त्यामुळे ती वाढलेली आढळते. नेमके औषधे न घेतल्याने वाढली आहे का?, की मुळातच औषध काम करत नाही हे ठरवणे अवघड जाते. म्हणून ‘एचबीए१सी’ने आपण ते ठरवू शकतो.

‘एचबीए१सी’च्या ऐवजी दुसरी कोणती चाचणी करता येते?

फ्रुक्टोसामिन चाचणीत प्रथिने शर्कराचे मोजमाप कमी कालावधीत (अंदाजे २ ते ३ आठवडे) शर्करा दर्शविते. ‘एचबीए१सी’चाचणीला मर्यादा येत असतील तेव्हा वरील चाचणी उपयोगी ठरते.

मधुमेहाचे निदान करण्यास ‘एचबीए१सी’ ही एकच चाचणी आहे. परंतु काही विशिष्ट, लोकांमध्ये ती उपयोगी नाही?

‘एचबीए१सी’ची चाचणी रक्तातील लाल पेशींवर अवलंबून असते. व्यक्तीस त्याचे आजार असतील यकृत किंवा किडनीचे उदा. हिमोग्लोबिनोपॅथी, थेलेसेमिया. अशा व्यक्तींमध्ये ‘एचबीए१सी’ परिणामांचे विश्लेषण करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा रक्तातील शर्करा नियमित तपासून फरक समजतो.

‘एचबीए१सी’तपासणीसाठी कोणती पद्धत वापरावी?

‘एचपीएलसी’ पद्धत ‘एचबीए१सी’साठी अचूक मानली जाते. यासाठी १०-२० वेगवेगळ्या पद्धत आहेत. तुमच्या लॅबमध्ये कोणती पद्धत वापरतात ते जाणून घ्या. त्यानुसार ‘एनएसजीपी’ प्रमाणित केलेल्या प्रयोगशाळेत तपासणी करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()