Weight Loss साठी सकाळी गरम पाणी पिताय? मग सावधान, होवू शकतं नुकसान

खास करून उन्हाळ्यामध्ये रोज सकाळी गरम पाणी पिण्याने आरोग्याच्या काही समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळेच जर तुम्हाला देखील सकाळी गरम पाणी पिण्याची सवय असेल तर आधी त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
गरम पाणी पिण्याचे दुष्परिणाम
गरम पाणी पिण्याचे दुष्परिणामEsakal
Updated on

अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ग्लास भरून किंवा काहीजण तर तांब्याभर गरम पाणी पितात. प्रत्येकजण वेगवेगळ्या उद्देशाने हे गरम पाणी पित असतात. खास करून वजन कमी करण्यासाठी Weight Loss अनेकजण सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पित असतात. Drining Hot Water for Weight Loss may be harmful Marathi Health Hacks

तर काहीजण पोट साफ होण्यासाठी कोमट पाणी पितात. कोलेस्ट्रॉल Cholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील अनेकजण सकाळी गरम पाणी Hot Water पिणं पसंत करतात. मात्र जास्त काळासाठी सकाळी गरम पाणी पिणं हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं 

खास करून उन्हाळ्यामध्ये रोज सकाळी गरम पाणी पिण्याने आरोग्याच्या काही समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळेच जर तुम्हाला देखील सकाळी गरम पाणी पिण्याची सवय असेल तर आधी त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या. 

शरीराचा पीएच बिघडू शकतो- रिकाम्यापोटी गरम पाणी पिणं शरीराच्या पीएचवर प्रभाव टाकू शकतं.  जेव्हा शरीराचं एसिडिक आणि बेसिक नेचर यांचं संतुलन बिघडतं तेव्हा शरीराचं pH बॅलेन्स बिघडतं. यामुळेच तुम्हाला एसिडिटीचा त्रासही होवू शकतो. तसचं रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने अपचन आणि ब्लोटिंगची समस्या निर्माण होवू शकते. 

आतड्यांच्या कार्यावर दुष्परिणाम- रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने कदाचित तुम्हाला पोट साफ होण्यासाठी एक दिवस मदत होवू शकते. मात्र रोज गरम पाणी प्यायल्याने मल जड होवू शकतं. यामुळे टिशूंना नुकसान होवू शकतं आणि आतड्यांच्या मल उत्सर्जनाच्या कार्यावर वाईट परिणाम होवू शकतो. 

त्यामुळे नियमित गरम पाणी पिणं टाळावं. यामुले बद्धकोष्ठता आणि मूळव्याधाची समस्या उद्भवू शकते. 

हे देखिल वाचा-

गरम पाणी पिण्याचे दुष्परिणाम
Hot Water : हे आजार पळवायचे असतील तर सकाळी प्या गरम पाणी

शरीर डीहायड्रेट राहू शकतं- रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होवू शकतं. गरम पाण्याचा स्वीकार तुमचं शरीर साध्या पाण्याप्रमाणे करत नसल्याने तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होवू शकते.  

किडनीच्या समस्या- गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या समस्या निर्माण होवू शकतात. किडनीमध्ये एक विशेष कोशिया प्रणाली असते जी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. गरम पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव निर्माण होतो आणि त्याचं काम करणं कठीण होतं. यामुळे किडनीचे आजार होवू शकतात.

हे देखिल वाचा-

गरम पाणी पिण्याचे दुष्परिणाम
Weight Loss : सुटलेल्या पोटाची लाज वाटतेय? वजन कमी करायचं आहे? आजच करा या टिप्स फॉलो...

अंतर्गत अवयव कुमकुवत होतात- जर तुम्ही दररोज सकाळी एकाच प्रमाणात गरम पाणी पित असाल तर तुमच्या अंतर्गत अवयवांचं नुकसान होवू शकतं. म्हणजेच तुमचं लिवर,किडनी, आतडी आणि इतर अवयवांच्या कार्यावर परिणाम होवू शकतं. गरम पाणी प्यायल्याने तुमच्या पोटात जळजळ देखील होवू शकते. 

त्यामुळेच जर तुम्हाला देखील दररोज सकाळी गरम पाणी पिण्याची सवय असले तर यात बदल करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेवू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.