Uric Acid Home Remedies: अनेक लोकांना चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे युरिक अॅसिडची समस्या निर्माण होते. शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास अनेक आरोग्यासंबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यूरिक ऍसिड हा शरीरात एक टाकाऊ पदार्थ असतो, जो प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटनाने तयार होतो.
किडनी शरीराबाहेर फिल्टर करते. पण जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा ते सांध्याभोवती क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधे दुखणे, सूज येणे, चालण्यात अडचण यासारख्या समस्यांना निर्माण होतात.