उन्हाळ्यात थंड पाणी पिता का? आताच थांबवा, नाहीतर..

तुम्हाला माहिती आहे का की थंड पाणी पिल्याने शरीरावर वाईट दुष्परीणाम होतात.
drinking cold water
drinking cold waterसकाळ
Updated on

उन्हाळ्यात थंड पाणी (Cold water) पिणे प्रत्येकाला आवडते. प्रत्येकाला उन्हाळ्यात थंड पाणी प्यावसं वाटतं. अनेक जण अति प्रमाणात थंड पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का की थंड पाणी पिल्याने शरीरावर वाईट दुष्परीणाम होतात. हो, हे खरंय. थंड पाणी पिल्याने अनेक शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील काही दुष्परीणाम आपण जाणून घेणार आहोत.(drinking cold water is bad for health check disadvantages here)

drinking cold water
डान्स करत करत Cholesterol कमी करा, जाणून घ्या फायदे

डोकेदुखी -

जास्त थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने मेंदू गोठतो आणि त्यामुळए डोक्यातील क्रॅनियल नर्व्हवरही याचा परिणाम होतो, ज्यामुळे डोकेदुखी वाढते.

घशाचा संसर्ग-

सातत्याने थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला घशाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. थंड पाण्यामुळे घशाचा संसर्ग होण्याबरोबरच कफही होऊ शकतो. कफमुळे ताप आणि खोकला देखील होऊ शकतो. त्यामुळे याचा शरीरावर दुष्परीणाम दिसून येतात.

अन्न पचण्यात अडचण -

उन्हाळ्यात जास्त थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. ज्यामुळे व्यक्तीला पचनामध्ये समस्या उद्भवू शकतात, यात पोटदुखी, मळमळ, यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

ऊर्जा पातळी खालावेल -

थंड पाणी प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया क्रिया कमी होतं आणि शरीरात जास्त काम करण्याची क्षमता राहत नाही. शरीर सुस्त राहते आणि ऊर्जा पातळी खालावते.

drinking cold water
जिरे मसाला पेयाने उन्हाळा होईल सुसह्य; जाणून घ्या रेसिपी

हृदय गती कमी होते

थंड पाणी तुमच्या हृदयाची गती कमी करते कारण ते मानेच्या मागच्या शिरावर परिणाम करते ज्यामुळे हृदय गती कमी होते. हे हृदयासाठी चांगले नाही, कारण यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

वजन कमी करण्यास अडथळा

थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी जड होते, ज्यामुळे चरबी कमी करणे कठीण जाते. कमीतकमी थंड पाणी पिण्याचा प्रयत्न करा नाहीतर वजन कमी करण्यास अडथळा निर्माण होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.