Milk Drinking Habit : रोज दूध पिणे चांगले आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

आरोग्य तज्ज्ञांच्या मते चुकीच्या केळी दूध प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात
Milk Drinking Habit
Milk Drinking Habitesakal
Updated on

Milk Drinking Habit : दुधात कॅल्शियम प्रथिने, जीवनसत्त्वे ए. के. डी. आणि आय, फॉस्फरस, मॅशियम आणि आयोडीन यासह अनेक पोषक असतात. यामुळेस दुधालाही पूर्ण अन्न मानले जाते. हाडे मजबूत करण्यासाठी तसेच स्नायूंच्या विकासासाठी दूध अत्यंत महत्त्वाचे आहे. पण दूध सकाळी प्यावे की रात्री हा महत्वाचा भाग आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते चुकीच्या केळी दूध प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोणत्या वेळी दूध पिणे योग्य आहे ते जाणून घेऊया.

जेवणानंतर लगेच दूध पिऊ नये

जेवल्यानंतर लगेच दूध पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. सोबतव दूध पिण्यापूर्वी आंबट पदार्थ किंवा फळे, दही, खारट पदार्थ खाणे टाळावे. असे केल्याने आरोग्याची हानी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते जेवल्यानंतर ४० मिनिटांनी दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

कोमट दूध फायदेशीर

कोमट दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, वृद्धांनी झोपण्याच्या एक तास आधी दूध प्यावे. यामुळे पचनसंस्थेवरही जास्त भार पडत नाही. कोमट दूध प्यायल्यास अनेक आजारांचा धोका टळतो. याशिवाय दिवसभराचा थकवाही निघून जातो आणि चांगली झोप लागते.

रिकाम्या पोटी दूध पिणे टाळावे

रिकाम्या पोटी दूध पिणे टाळावे. काहीही न खाता दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. जे लोकांना पचनाच्या समस्येने त्रस्त आहे त्यांना काही खाल्ल्यानंतर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो तथापि, लहान मुलांसाठी असे करणे हानिकारक नाही. ते कधीही दूध पिऊ शकतात आणि असे केल्याने त्यांना ऊर्जा मिळते.

Milk Drinking Habit
Morning Drink : मॉर्निंग वॉकनंतर ज्युस पिणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

लहान मुलांना दूध अत्यावश्यकच

घरातील लहान मुलांना दूध पिणे अत्यावश्यक असते. कारण त्यांचा संपूर्ण विकास होण्यासाठी विविध जीवनसत्व आणि प्रथिनांची गरज असते त्यांच्या मंदूच्या विकासासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी दूध पिणे आवश्यक आहे. त्यात फ्लेवरसाठी कोणतेही सप्लिमेंट अँड करू शकता. पण दुधावर भर असावा बाजारात मिळणाऱ्या सप्लिमेंटवर भर देऊ नये. (Health)

Milk Drinking Habit
Mother Milk Bank: जिल्हा रुग्णालयात ‘मदर मिल्क बँक’ स्थापणार : पालकमंत्री पाटील

दूध प्यायल्यावर ब्रश करावा

■ आपण जर रात्री दूध पित असू तर त्यानंतर ब्रश करणे आवश्यक आहे. अन्यथा यातील साखरेमुळे दातांना दीर्घकाळानंतर कीड लागण्याची शक्यता असते. ब्रश केल्याने तोंड स्वच्छ होऊन मुखरोगापाखन आपल्याला दूर राहता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()