Polydipsia Causes And Treatment: शरीराला निरोगी आणि तंदुरूस्त ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांची गरज असते. तसेच दिवसभर पुरेसे पाणी पिणेही आवश्यक असते. कोणताही ऋतू असो, दिवसभरात प्रत्येकाने किमान तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉक्टर देतात. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का पाणी प्यायल्यावर देखील वारंवार तहान लागत असेल ते आरोग्यासाठी चांगले नाही. डॉक्टरांच्या मते, मसालेदार पदार्थ, गरम पदार्थ किंवा खुप व्यायाम केल्यानंतर तहान लागणे सामान्य आहे. तसेच उन्हाळ्यात सारखी तहान लागणे साहजिक आहे. पण कधीकधी पाणी प्यायल्यानंतर देखील सारखे पाणी प्यावेसे वाटत असेल तर पुढील आजाराचे लक्षण असू शकते.