Men Fertility: पाणी पिणे शरीरासाठी खूप गरजेचे असते. ऑफिसच्या ठिकाणी किंवा बाहेर जाताना आपण सहसा बाटलीत पाणी सोबत नेत असतो. प्लास्टिकच्या बाटलीत जो तो तुम्हाला पाणी कॅरी करताना दिसतो. बाटली नसेल सोबत तर दुकानांत सहज उपलब्ध असणारं सिल पॅक मिनरल वॉटर सगळेच पितात. मात्र त्याने तुमच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतोय याची जाणीव तुम्हाला आहे काय?
रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
फ्रंटिअर्स डॉट ओरजीने एका संशोधनात मोठा खुलासा केला आहे. संशोधनानुसार सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने बाटलीबंद पाणी गरम होतं, यामुळे प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये असलेले मायक्रोप्लास्टिक्स पाण्यात मिसळत. ते पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि शरीरातील हार्मोन्सला हानी पोहोचवतात.
एवढंच नव्हे तर मनुष्याच्या प्रजनन क्षमतेवरही याचा परिणाम होऊ शकतो. बाटलीबंद पाणी जास्त काळ प्यायल्याने वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. याचा परिणाम म्हणजेच तुम्ही भविष्यात आई किंवा वडील बनू शकणार नाही. बाटलीबंद पाणी तुमच्या यकृतालाही (Liver) हानी पोहोचवत आहे.
प्लास्टिकमुळे पर्यावरणालाही धोका
बाटलीबंद पाणी हे प्लास्टिकच्या बाटलीत बंद असतं. पाणी प्यायल्यानंतर या प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोगच नसतो, त्यामुळे ती बाटली आपण फेकून देतो. पण प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. रॉयटरच्या अहवालानुसार पृथ्वीवर दर एका मिनीटाला 10 लाख प्लॅस्टिकच्या बाटल्या विकल्या जातात. तर युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2021 मध्ये जगभरात 480 अब्ज प्लास्टिकच्या बाटल्या विकल्या गेल्या आहेत.
बाटलीबंद पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललाय
अलीकडे तुम्हाला सार्वजनिक पाणीपुरवठा अगदी कमी प्रमाणात दिसून येईल. त्यामुळे अगदी छोट्या दुकानतही सहजपण उपलब्ध होणारं बाटलीबंद पाणी आपण विकत घेतो. सार्वजिनिक कार्यक्रमांमध्ये, कार्यालयांमध्ये बाटलीबंद पाण्याचाच वापर केला जातो.
पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कमतरता, यामुळे बाटलीबंद (bottled water) पाण्याच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे. पण दीर्घ काळ बाटलीबंद पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही. बाटली तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक पेट्रोलियम पदार्थ आणि इतर रसायनांचा वापर करून तयार केलं जातं. त्यामुळे ही पाण्याची बाटली कालांतराने खराब होऊ शकते आणि त्या बाटलीतली रसायनं पाण्यात मिसळू शकतात. त्याने तुमच्या जीवाला धोका पोहोचतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.