Dry Eye Syndrome : उन्हाळ्यात लोकांना होत आहे ड्राय आय सिंड्रोम; वेळीच ओळखा लक्षणे!

सूर्यप्रकाशात उघड्या डोळ्यांनी थेट जात असाल तर या सिंड्रोमचा आजार होऊ शकतो
Dry Eye Syndrome : उन्हाळ्यात  लोकांना होत आहे ड्राय आय सिंड्रोम; वेळीच ओळखा लक्षणे!
esakal
Updated on

Dry Eye Syndrome :

अनेक लोकांना सध्या डोळे कोरडे होण्याचा त्रास होत आहे. सामान्य भाषेत आपण याला डोळे कोरडे होणे असे म्हणतो. पण, खरं तर आपण एका गंभीर आजाराला बळी पडत आहोत. ज्याला शास्त्रीय भाषेत ड्राय आय सिंड्रोम असे म्हणतात.

देशातील काही राज्यांमध्ये तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. उष्माघात, डिहायड्रेशन आणि पोटाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. उष्णतेमुळे लोक ड्राय आय सिंड्रोमलाही बळी पडत आहेत. (Eye Care Tips)

Dry Eye Syndrome : उन्हाळ्यात  लोकांना होत आहे ड्राय आय सिंड्रोम; वेळीच ओळखा लक्षणे!
Diet For Healthy Eyes : दृष्टी सुधारण्यात गाजरापेक्षाही हे पदार्थ जास्त मदत करतील,वेळीच खायला सुरू करा

या सिंड्रोमच्या परिणामावर वेळीच उपचार न केल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते. ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय आणि ते कसे टाळता येईल हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया.

डॉक्टरांच्या मते, हा डोळ्यांशी संबंधित आजार आहे. या आजारात डोळ्यांमध्ये पुरेशा प्रमाणात द्रव तयार होत नाही तेव्हा होतो. त्यामुळे डोळे कोरडे राहून खाज सुटते. यावर वेळीच उपचार न केल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते. सध्या या आजाराचे अधिक रुग्ण रुग्णालयात येत आहेत.

ड्राय आय सिंड्रोमची समस्या का होत आहे?

सध्या अनेक रुग्णांना ड्राय आय सिंड्रोमची समस्या भेडसावत आहे. अतिउष्णतेमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे हे घडत आहे. जे लोक जास्त वेळ उन्हात राहतात त्यांना जास्त त्रास होतो.

Dry Eye Syndrome : उन्हाळ्यात  लोकांना होत आहे ड्राय आय सिंड्रोम; वेळीच ओळखा लक्षणे!
Holi Eye Care: होळीचा रंग डोळ्यात गेल्यास लगेच करू नका 'हे' काम

डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यात ओलावा कमी होणे अशा समस्या लोकांना भेडसावत आहेत. उष्णतेमुळे डोळ्यातील पाणी सुकताता. डोळे लाल होऊन सुजतात त्याला ड्राय आय सिंड्रोम म्हणतात.

आपल्या डोळ्यांवर कॉर्निया म्हणजे डोळ्यांच्या वर एक थर असतो, जो डोळ्यांचा पुढचा भाग झाकण्याचे काम करतो, याला कॉर्निया म्हणतात. अति उष्णतेमुळे कॉर्निया बर्न देखील होऊ शकते. त्यामुळे अंधुक दिसण्याची समस्या निर्माण होते. या समस्यांवर वेळीच उपचार न केल्यास डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो. ज्यांना आधीच डोळ्यांचा त्रास आहे, त्यांच्या समस्या आणखी वाढत आहेत.

सूर्यप्रकाशात उघड्या डोळ्यांनी थेट जात असाल तर या सिंड्रोमचा आजार होऊ शकतो. जेव्हा सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे डोळ्यांवर पडतात. तेव्हा त्याचा कॉर्नियावरही परिणाम होतो आणि त्यामुळे कॉर्निया बर्न होऊ शकते. ज्यामुळे डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.

Dry Eye Syndrome : उन्हाळ्यात  लोकांना होत आहे ड्राय आय सिंड्रोम; वेळीच ओळखा लक्षणे!
Eye Protection Tips : कडक उन्हाळ्यात सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

या गंभीर आजारापासून संरक्षण कसे करावे

  • बाहेर जाताना सनग्लासेस घाला

  • थंड पाण्याने डोळे सतत धूवा

  • डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आय ड्रॉप्स घाला

  • जास्त वेळ उन्हात राहू नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com