माझा मुलगा २२ वर्षांचा आहे. धुळीच्या संपर्कात आल्यास त्याला लगेच सर्दी होते, ताप येतो, डोके दुखते व बराच त्रास होतो. खूप औषधे घेतली पण फरक पडत नाही. त्याची प्रकृती उष्ण आहे त्यामुळे आयुर्वेदिक औषधे कशी देता येतील या यबद्दल मनात शंका आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
- तेजस्विनी महाडिक, कोल्हापूर
उत्तर : आयुर्वेदात सर्दीवर उष्ण औषधे दिली जातात असा गैरसमज समाजात आढळतो, पण ते खरे नव्हे. प्रकृतीनुसार व आजाराप्रमाणे आयुर्वेदिक औषधे बदलत असतात. मुलाच्या शरीरात असलेली उष्णता कम करण्यासाठी औषधे सर्दी-खोकल्याच्या औषधांबरोबर देता येतील. तूर्त तरी त्याला रोज रात्री झोपताना संतुलन अविपत्तिकर चूर्ण पाण्याबरोबर देणे सुरू करावे.
रोज सकाळ-संध्याकाळ संतुलन पित्तशांती गोळ्या घेण्याचा व तूप-मधात मिसळून संतुलन सितोपलादी चूर्ण घेण्याचा फायदा होताना दिसेल. बरोबरीने संतुलनचे च्यवनप्राश सकाळी अनाशेपेटी घेतलेले उत्तम ठरेल. नाकात नस्यसॅन घृताचे २-३ थेंब दिवसातून २-३ वेळा टाकण्याचा फायदा होऊ शकेल. एकूणच पित्ताचा व ॲलर्जीचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने संतुलनचे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचा फायदा मिळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.