छत्रपती संभाजीनगर : लाइफस्टाइल हेल्दी राहावे, याकरिता बहुतांश जण डाएटमध्ये ड्रॅगन फ्रूटचा आवर्जून समावेश करतात. या फळामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या अनेक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रोटीन, कर्ब, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. बरेच आजार शरीरापासून दूर राहतात. सध्या त्याचे दर २१० रुपये प्रतिकिलो आहे.
या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांसारखे अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात. महत्त्वाचे म्हणजे यात फॅट्सचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.
ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरीज कमी असतात, परंतु त्यात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यासोबतच यामध्ये फायबरदेखील असते. फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स इत्यादी अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे कर्करोग आणि इतर समस्या निर्माण होत नाहीत.
रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे, परंतु या स्थितीत किती प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकते, याचा सल्ला डॉक्टरांना विचारून घ्या. ड्रॅगन फ्रूट हे नैसर्गिकरीत्या फॅट फ्री आणि जास्त फायबर असलेले फळ आहे.
हा एक चांगला नाश्ता असू शकतो, जे खाल्ल्यानंतर तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही. या फळामध्ये प्रोबायोटिक्स असतात. जास्त प्रोबायोटिक्स घेतल्याने आतड्यातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन राखले जाते. यामुळे अन्न पचण्यासही मदत होते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात, जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरातील ऑक्सिजनच्या योग्य पातळीकरिता लोह आवश्यक आहे आणि ते आपल्याला ऊर्जा देते. ड्रॅगन फ्रूट लोहचा चांगला स्रोत आहे.
ड्रॅगन फ्रूट पोट निरोगी ठेवते. यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठी तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे सेवन करू शकता. रक्ताची कमतरता असणे चांगले नाही. यामुळे तुम्हाला थकवा, अशक्तपणा; तसेच चक्कर आल्यासारखे वाटू शकते. हिमोग्लोबिनची पातळी कमी असलेल्या लोकांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.
ड्रॅगन फ्रूट हे मूळचे मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील असून कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्स या देशांमध्ये; तसेच भारतामध्ये त्याची लागवड केली जाते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, केरळ आणि आंध प्रदेश या राज्यांमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली जाते.
देशात गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतसुद्धा लहान क्षेत्रावर व्यापारीदृष्ट्या त्याची लागवड होत आहे; तसेच महाराष्ट्रातील कमी पावसाच्या क्षेत्रात उदा. सोलापूर, पुणे (शिरूर), सांगली (जत) येथेसुद्धा व्यापारी तत्त्वावर या पिकाची लागवड सुरू झाली आहे.
ड्रॅगन फ्रूटचे अनेक फायदे आहेत. ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स इत्यादी अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे कर्करोग आणि इतर समस्या निर्माण होत नाहीत. रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे, परंतु या स्थितीत किती प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
— डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.