Egg Benefits : रिकाम्या पोटी अंडी खाणे चांगले की वाईट? हे वाचाच

रिकाम्या पोटी अंडी खाणे कितपत चांगले आहे?
Egg Benefits
Egg Benefitssakal
Updated on

अनेकांना तुम्ही सकाळी नाश्त्यात अंडी खाताना पाहिले असेल पण कधी विचार केला की रिकाम्या पोटी अंडी खाणे कितपत चांगले आहे? नाही, अनेकांनी या विषयी विचारही केला नसेल.

खरं तर, अंडी ही हाय प्रोटीन आणि लो कॅलरी असणारे फूड आहे ज्याला नाश्त्यात खाल्ल्याने दिवसभर एनर्जी मिळते. याशिवाय वेट लॉस करणाऱ्यांसाठी हे अधिक फायदेशीर आहे पण तरीही रिकाम्या पोटी अंडी खाणे चांगले की वाईट, हा प्रश्न पडतोच. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (eating Egg at empty stomach is good or bad read story)

सकाळी रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने काय होतं?

एक अंड्यात 80-100 कॅलरी असतात सोबतच यात अमीनो अॅसिडही असते जे शरीराला खास प्रोटीन देते. जेव्हा आपण रिकाम्या पोटी अंड्याचं सेवन करतो त्यावेळी आपलं मेटाबॉलिजम वाढते आणि पचनक्रिया अधिक तेजीने काम करते.

याशिवाय अंड्यामध्ये पॉलीअनसॅचुरेटेड फॅट पण असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते तर यामुळे गुड कोलेस्ट्रॉलही वाढतं.

Egg Benefits
Egg Curry : अंडा करी खा अन् इम्युनिटी वाढवा

सकाळी रिकाम्या पोटी अंडी खाण्याचे फायदे 

  • अंड्यामधील ओमेगा-3 फॅटी अॅसिड चांगला स्त्रोत आहे. यामुळे अंडी ही हार्ट हेल्दी फूड बनण्यास मदत होते.

  • अंडे ल्यूटिन और जॅक्सेथिनमुळे डोळ्यांच आरोग्य जपण्यास मदत होणार.

  • मानसिक आरोग्यही उत्तम ठेवण्यासही मदत होते.

  • नाश्त्यात उकळलेली अंडी खावं त्याचा अधिक फायदा होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()