Side Effects of Oregano : ओरिगॅनो वाढवतं पिझ्झा-पास्ताची चव, मात्र अतिसेवन ठरतंय घातक!

ओरिगॅनोचे अतिप्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरते.
Side Effects of Oregano
Side Effects of Oreganoesakal
Updated on

Side Effects of Oregano : आजकाल पिझ्झा, सॅंडविच, पास्ता आणि बर्गर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. तरूणाईसोबतच लहान मुलांमध्ये हे खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. हे पदार्थ जरी सर्वांच्या आवडीचे असले तरी सुद्धा त्याचे किती प्रमाणात सेवन करावे?याला ही काही मर्यादा आहेत.

या खाद्यपदार्थांमध्ये ओरिगॅनोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शिवाय, अनेक जणांना पिझ्झा, सॅंडविच, पास्तासोबत अधिक प्रमाणात ओरिगॅनो खायला आवडतो. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का की या ओरिगॅनोचे अतिप्रमाणात सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

ओरिगॅनोचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये, मेक्सिकन ओरिगॅनो, युरोपियन ओरिगॅनो, ग्रीक ओरिगॅनो इत्यादी प्रकार आहेत. परंतु, पिझ्झा आणि पास्त्यामध्ये वापरले जाणारे ओरिगॅनो हे मेक्सिन ओरिगॅनो आहे. हे ओरिगॅनो आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. ओरिगॅनोचे अतिप्रमाणात सेवन करणे हे अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. कोणत्या आहेत या समस्या? चला तर मग जाणून घेऊयात.

Side Effects of Oregano
Tulsi And Ginger Tea : हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘हा’ हर्बल चहा आहे फायदेशीर

पोटाच्या समस्या

ओरिगॅनोमध्ये कार्वोन नावाचे एक कंपाऊंड आढळून येतो. या कार्वोनमुळे पोटाच्या समस्या जसे की, अपचन, पोट फुगणे, पोटदुखी आणि गॅसेस सारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, पिझ्झा किंवा पास्ता खाताना ओरिगॅनोचा अतिवापर करणे टाळा.

त्वचेच्या समस्या

ओरिगॅनोच्या अतिसेवनामुळे त्वचेच्या देखील समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय, यामुळे अनेकांना स्किन अ‍ॅलर्जीसारख्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. काही जणांना या ओरिगॅनोमध्ये आढळणाऱ्या कार्वोन नावाच्या संयुगाची देखील अ‍ॅलर्जी असू शकते. या कार्वोनमुळे त्वचेला जळजळ आणि त्वचेमध्ये रॅशेस होऊ शकतात.

Side Effects of Oregano
Scrubs For Dry Skin : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात?ओट्स आहेत मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड स्क्रब्स

गर्भपाताचा धोका संभवतो

ओरिगॅनोमध्ये अनेक प्रकारचे संयुगे असतात. कार्वोनसारखेच अँटी-प्लेटलेट संयुगे देखील ओरिगॅनोमध्ये आढळून येतात. या संयुगांमुळे रक्तातील गुठळ्या रोखल्या जातात, त्यामुळे, गर्भधारणे दरम्यान ओरिगॅनोचे सेवन करणे हे धोकादायक ठरू शकते.

ओरिगॅनो हा एक प्रकारचा गरम मसालाच आहे. त्यामुळे, त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते. ज्यामुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.