Monsoon Health Tips :पावसाळ्यात चहा-भजीचं कॉम्बिनेशन आहे बेस्ट; पण, आधी आमचं थोड ऐकून घ्या, नाहीतर महागात पडेल

पावसाळ्यात वाफळलेला चहा अन् त्यासोबत कांदा भजी मिळालं तर आहाहा...
Eating pakoda with tea is not good for health
Eating pakoda with tea is not good for health
Updated on

पावसाळ्यात वाफळलेला चहा अन् त्यासोबत कांदा भजी मिळालं तर आहाहा...या दोघांच समीकरणचं वेगळं आहे. चहाची टपरीच काय घरामध्ये सुद्धा पाऊस पडत असताना चहासोबत भजी खाण्याला अधिक पसंती देतात. पण तुम्हाला माहितीय का हा चहा आणि भजीचा बेत तुमच्यासाठी घातक ठरतो. हे वाचल्यावर ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसले. पण हो हे खरं आहे. तर ते कसं जाणून घेऊयात.

Eating pakoda with tea is not good for health
पावसाळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी 'खा' हिरव्या टोमॅटोचे लोणचे; फक्त १० मिनीटांची रेसिपी

काही पदार्थ चहासोबत खाण आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. चहासोबत अनेकांना भजीच काय तर फरसाणा, वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा, चकली असे अनेक पदार्थ खायला आवडतात. पण ही सवय चांगली नाही. तुम्ही स्वतःहूनच हे संकट ओढावून घेताय.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात. तसेच शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे बेसनापासून बनवलेल्या पदार्थांचे चहासोबत कधीही सेवन करू नका.

Eating pakoda with tea is not good for health
साखर खाणंच बंद केलं तर काय होईल? घ्या जाणून

तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन कोणत्याही ऋतूत आरोग्यासाठी चांगले नाही. जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. केवळ भजीच नाहीतर चहासोबत बिस्किटे आणि जंक फूड खाणेही टाळावे.

जास्त चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स, बीपी, पोटाची चरबी, ऍसिडिटी आणि पचनाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात खाण्यापिण्याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे.

Eating pakoda with tea is not good for health
Ginger Benefits: कच्च आलं खा अन् रहा निरोगी

तसेच, मीठ व दूध कधीच एकत्र खाऊ नये. म्हणजेच चहामध्ये दूध असते तर भजी, पोळी फरसाण हे तेलकट आणि खारट असतं, त्यामुळे फरसाण आणि चहा एकत्र घेतल्यास पोटात दुखू शकते. त्यामुळे दुधाच्या पदार्थांसह फरसाण अर्थात खारट पदार्थांचे सेवन करू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.