Pizza Increase Risk of Cancer : सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली आणि फास्टफूड खाण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे, आरोग्याची हानी होत आहे. आजकाल फास्टफूड ज्याला जंक फूड म्हणून ही ओळखले जाते, ते खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण आजकाल पिझ्झा, बर्गर, पास्ता, चायनिज इत्यादी अनेक खाद्यपदार्थांचे सेवन करू लागले आहेत. खरं तर याचे अतिप्रमाणात सेवन करणे हे एखाद्या विषाचे सेवन करण्यासारखेच आहे. त्यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार जर एखादी व्यक्ती नियमितपणे पिझ्झाचे आणि क्रिस्पी पदार्थांचे सेवन करत असेल तर त्या व्यक्तीला तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका 25 टक्क्यांनी वाढतो.
विशेष म्हणजे हे संशोधन खूप मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. ज्यामध्ये जवळपास 4.5 लाख लोकांच्या आहाराच्या ट्रेंडचे विश्लेषण करण्यात आले आहे.
३५० ग्रॅम अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचे नियमितपणे सेवन केल्याने घशाचा आणि तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका आहे, असे ग्लोबल डायबिटीज कम्युनिटीने या संशोधनात म्हटले आहे. शिवाय, हा धोका अनेक पटींनी वाढू शकतो.
पिझ्झा आणि क्रिस्पी खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जाते. संशोधनात असे ही म्हटले आहे की, ३५० ग्रॅम पिझ्झा हा एक पॅकेट क्रिस्पी खाद्यपदार्थाच्या तुलनेत सारखाच आहे.
पिझ्झा आणि क्रिस्पी पदार्थांसोबतच अन्य अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये केक, फिज्जी ड्रिंक्स, मिठाई आणि अनेक प्रकारच्या फास्टफूड्सचा समावेश आढळून येतो. हे संशोधन फार मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून यामध्ये जवळपास ४.५ लाख लोकांनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये लोकांच्या नियमित खाण्याच्या सवयींची, खाद्यपदार्थांची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर, संशोधनात असे आढळून आले की, नियमितपणे पिझ्झा खाणाऱ्यांमध्ये तोंड आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका हा २५ टक्क्यांपर्यंत जास्त होता. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे, पिझ्झाचे आणि इतर फास्टफूडचे अतिसेवन करणे टाळा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.