Health Tips: वजन कमी करायचंय मग हे चॉकलेट खाऊन बघा, ही आहे खाण्याची योग्य पद्धत!

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक डायटिंग, एक्सरसाइज सारख्या पद्धतींचा अवलंब करतात, पण या सगळ्यानंतरही काही लोक वजन कमी करत नाहीत
dark chocolate
dark chocolatesakal
Updated on

चॉकलेटची क्रेझ प्रत्येक व्यक्तीला असते. जगभरात अनेक चॉकलेट प्रेमी आहेत. अनेक देशांमध्ये चॉकलेट सण साजरा केला जातो. एकीकडे जास्त चॉकलेट खाल्ल्याने नुकसान होऊ शकते, त्यातील एक म्हणजे वजन वाढणे, तर दुसरीकडे डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ल्याने अनेक फायदे होतात. चॉकलेटप्रेमींना कधी-कधी चॉकलेट खाण्यापासून रोखावे लागते कारण त्यांना वजन वाढण्याची चिंता असते.

पण आता तुम्ही डार्क चॉकलेट खाऊन देखील वजन कमी करू शकता. होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण तुम्ही आता चॉकलेट खाऊन वजन कमी करू शकता. डार्क चॉकलेट ही न आवडणारी गोष्ट आहे कारण ते चवीला खूप कडू असते. आज आम्ही तुम्हला वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन कसे करावे हे सांगणार आहोत.

dark chocolate
Healthy Food : इरेक्शनपासून शक्तीपर्यंत; या एका पदार्थाच्या सेवनाने पुरुषांना मिळतात अनेक फायदे

अशा प्रकारे खा वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट

  • महत्वाची गोष्ट म्हणजे डार्क चॉकलेट खाणे हे व्यसनासारखे असू शकते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी याचे सेवन करताना एक मर्यादा बनवा. डार्क चॉकलेटचे दिवसातून दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर एक किंवा दोन तुकडे खाल्ल्याने तुमची गोड खाण्याची लालसा कमी होते. तुम्ही लंच किंवा डिनरनंतर देखील डार्क चॉकलेट खाऊ शकता.

  • तुम्ही डार्क चॉकलेट स्मूदी किंवा मिल्क शेक बनवून पिऊ शकता. पण ही स्मूदी बनवताना त्यात चॉकलेटची जास्त भर पडणार नाही याची काळजी घ्या. यासाठी एक कप दुधात 2 क्यूब चॉकलेट घालून तुम्ही शेक बनवून पिऊ शकता.

dark chocolate
Arogya Mantra : पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर आरोग्यदायी, वाचा फायदे
  • डार्क चॉकलेटचे 24 तासात दोन तुकडे खाल्ल्याने शरीराला १९० कॅलरीज मिळतात. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि आकार राखण्यास मदत होते. त्यामुळे काहीही विचार न करता तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता.

  • डार्क चॉकलेट कॉफी तुमचे वजन कमी करण्यास देखील मदत करते. डार्क चॉकलेट कॉफी संध्याकाळच्या पेयांसाठी सर्वोत्तम मानली जाते. तसेच यामुळे दिवसभराचा थकवा देखील दूर होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.