अनियमित खाण्याच्या सवयी, जेवण चुकवणे किंवा अरबटचरबट खाणे, आम्लपित्त, पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या विकाराचे कारण असू शकते. बराच काळ या सवयी असल्यास चयापचयाच्या तक्रारी उद्भवून स्थूलत्व, उच्च रक्तदाब व टाइप २ मधुमेह होऊ शकतो. आतापर्यंत मी काय खावे आणि किती खावे याबाबत लिहीत आले आहे; परंतु ‘कधी खायचे’ हे विचारपूर्वक ठरवल्यास आपले आरोग्य आणि स्वास्थ्यामध्ये बरीच सुधारणा होऊ शकते. येथे काही मार्गदर्शक तत्त्वे देत आहे ज्यामुळे योग्य पचन, स्थिर ऊर्जाशक्ती आणि जास्त आरोग्यदायी चयापचय यासाठी दिवसभरात आपले अन्न कसे विभागले जावे हे समजेल.