Vertigo Risk : भोवतालचं जग गोल-गोल फिरू लागतं; व्हर्टिगो कितपत धोकादायक आहे ?

भारतातील ९.९ दशलक्षांहून अधिक व्‍यक्‍तींना चक्‍कर येते . प्रत्‍येकाला त्‍याच्‍या जीवनात कधी ना कधी चक्‍कर येण्‍याचा अनुभव येतो, पण व्‍हर्टिगो वेगळे आहे.
Vertigo Risk
Vertigo Risk google
Updated on

मुंबई : भारतातील ९.९ दशलक्षांहून अधिक व्‍यक्‍तींना चक्‍कर येते . प्रत्‍येकाला त्‍याच्‍या जीवनात कधी ना कधी चक्‍कर येण्‍याचा अनुभव येतो, पण व्‍हर्टिगो वेगळे आहे. हा बॅलन्‍स डिस्‍ऑर्डर आहे, ज्‍यामुळे अचानक चक्कर आल्‍यासारखे वाटू शकते, ज्‍यामुळे आसपासचे जग फिरत आहे असे वाटते.

हे त्रासदायक आहे आणि कोणत्‍याही पूर्वसूचनेशिवाय होऊ शकते. ज्‍यामुळे फक्‍त ‘चक्‍कर आली होती’ असे म्‍हणत याकडे दुर्लक्ष न करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

याबाबत तपासणी न केल्‍यास व्‍हर्टिगोचा जीवनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. लोक नेहमीची कामे किंवा खास प्रसंग जसे किराणा खरेदी, प्रवास, काम, मित्र व नातेवाईकांना भेटणे, सुट्टीची धमाल करण्‍यास जाणे यांना गृहीत धरतात, पण हे व्‍हर्टिगोने पीडित व्‍यक्‍तीसाठी अत्‍यंत अवघड ठरू शकते.  हेही वाचा - Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी ? (effects of Vertigo on daily life Vertigo management is the Vertigo dangerous )

Vertigo Risk
Dr. Aambedkar : पालकांचं १४वं अपत्य, ५व्या वर्षी आईला गमावलं; कसं होतं बाबासाहेबांचं बालपण ?

प्रतिष्ठित जागतिक व्‍हर्टिगो तज्ञ डॉ. मायकेल स्‍ट्रप, प्रोफेसर ऑफ न्‍यूरोलॉजी, डिपार्टमेंट ऑफ न्‍यूरोलॉजी आणि जर्मन सेंटर फॉर व्‍हर्टिगो अॅण्‍ड बॅल्‍न्‍स डिस्‍ऑर्डर्स, हॉस्पिटल ऑफ लडविग मॅक्सिमिलियन्‍स युनिव्‍हर्सिटी, म्‍युनिक, जर्मनी म्‍हणाले, ‘‘जगभरातील १० पैकी एका व्‍यक्‍तीला व्‍हर्टिगो आजार होतो.

निदानामध्‍ये आजही आव्‍हाने दिसून येतात, ज्‍यामुळे उपचार घेण्‍याचा प्रवास लांब व अवघड असू शकतो. याचे अधिक प्रमाण असताना देखील रूग्‍ण व आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांमध्‍ये या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. पण एखाद्या व्‍यक्‍तीमध्‍ये या आजाराचे अचूक निदान झाले तर त्‍यावर उपचार करता येतो.’’

डॉ. स्‍ट्रप पुढे म्‍हणाले, ‘‘उपचारांमुळे लक्षणांमध्‍ये सुधारणा होत असली तरी अनेकदा व्‍हर्टिगोने पीडित व्‍यक्‍ती निर्धारित केलेल्‍या उपचाराचे पालन करत नाहीत. यामुळे लक्षणे पुन्‍हा दिसून येऊ शकतात.

आपण या आजाराची लक्षणे आणि प्रीस्‍क्राइब केलेला उपचार घेत या आजाराचे कशाप्रकारे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते याबाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना व्‍हर्टिगो नियंत्रणात ठेवण्‍यासाठी आवश्‍यक असलेला पाठिंबा मिळू शकतो.’’

व्हर्टिगो कोणत्याही वयात होऊ शकतो, पण हा आजार सामान्‍यत: वृद्धांमध्‍ये दिसून येतो, जेथे ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्‍या जवळपास ३० टक्‍के व्‍यक्‍तींना आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्‍या जवळपास ५० टक्‍के व्‍यक्‍तींना व्हर्टिगो व चक्‍कर येणे यांचा अनुभव येतो.

भारतातील वृद्ध लोकसंख्या (६० वर्षे आणि त्यावरील) २०३१ पर्यंत १९४ दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. व्‍हर्टिगो धोकादायक नसले तरी, अचानक झालेला हल्ला चिंताजनक असू शकतो आणि चक्‍कर येऊन पडणे व फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

चक्‍कर येऊन पडण्याच्या भीतीमुळे चिंता व नैराश्य, तसेच पॅनीक अटॅक यांसारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. वयोवृद्धांना अशा परिस्थितीची भीती देखील वाटू शकते, ज्‍यामधून बाहेर पडणे अवघड असू शकते किंवा मदत आवाक्याबाहेर असू शकते.

याव्यतिरिक्त, महिलांमध्ये व्हर्टिगो अधिक सामान्य आहे - आणि पुरुषांपेक्षा त्यांना व्‍हर्टिगो आजार होण्‍याची शक्यता दोन ते तीन पट जास्त असते. याचे कारण अस्पष्ट असले तरी तज्ञांच्या मते हे हार्मोनल प्रभावामुळे असू शकते. महिलेच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वाढलेल्या हार्मोनल चढउतारांमुळे व्हर्टिगो होऊ शकतो.

उदाहरणार्थ, काही महिलांनी त्‍यांच्‍या मासिक पाळीपूर्वी व्हर्टिगो पॅटर्न्‍समध्‍ये वाढ झाल्‍याची नोंद केली आहे. रजोनिवृत्तीच्‍या संक्रमणादरम्‍यान महिलांना हार्मोनल चढउताराचा देखील अनुभव येतो, ज्‍यामुळे मायग्रेन होऊ शकते. व्‍हर्टिगोचा मायग्रेनशी प्रबळ संबंध आहे.

Vertigo Risk
Muscle Strength : ३ सोप्या उपायांनी स्नायू बळकट करा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा

अॅबॉट इंडियाचे मेडिकल डायरेक्‍टर डॉ. जेजो करणकुमार म्‍हणाले, ‘‘व्‍हर्टिगोचा व्‍यक्‍तीच्‍या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, त्‍यांच्‍या जीवनाच्‍या पुरेपूर आनंद घेण्‍यामध्‍ये अडथळा निर्माण करू शकतो.

अॅबॉटमध्‍ये आमचा व्‍यक्‍तींना व्‍हर्टिगोचे लवकर निदान करण्‍यास मदत करण्याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे त्‍यांना आवश्‍यक असलेली केअर मिळू शकेल आणि ते आत्‍मविश्‍वासाने जीवनात पुढे जाऊ शकतील.

लोकांना त्‍यांच्‍या आरोग्‍यावर नियंत्रण ठेवण्‍यास सक्षम करण्‍यासाठी अॅबॉट नैदानिक साधनांच्‍या उपलब्‍धतेसह व्‍हर्टिगोचे निदान सुधारण्‍याप्रती सक्रियपणे काम करत आहे.

आम्‍ही डॉक्‍टरांना वर्कशॉप्‍समध्‍ये सामील करत या स्थितीबाबत माहिती देतो आणि त्‍याचे निराकरण करण्‍याचे मार्ग सांगतो. यामध्‍ये रोबोटिक हेडचा समावेश आहे, जो डॉक्‍टरांना डोके व डोळ्यांच्‍या हालचालींवरून या स्थितीबाबत सर्वोत्तमपणे समजण्‍यास मदत करतो.’’

अनिश्चितता आणि नियंत्रणाच्या अभावाच्‍या कारणास्‍तव व्हर्टिगोमुळे निराशा होऊ शकते. यामुळे स्मरणशक्तीची कमतरता किंवा ‘ब्रेन फॉग’ यांसह इतर आव्हाने उद्भवू शकतात, ज्यामुळे व्यक्तीच्या स्पष्टपणे विचार करण्याची, लक्ष केंद्रित करण्याची किंवा माहिती लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

व्हर्टिगोचा व्‍यक्‍तीच्‍या जीवनातील विविध पैलूंवर देखील परिणाम होतो – ज्यामुळे स्वातंत्र्य गमावले जाते, दैनंदिन क्रियाकलापांमध्ये व्यत्यय येतो. या आजाराचा श्रमजीवी व्‍यक्‍तींवर देखील परिणाम होतो आणि कामाचे दिवस गमावणे, नोकरी बदलणे किंवा काम पूर्णपणे सोडून देणे यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

व्हर्टिगोचे व्यवस्थापन करता येते. एकदा त्याचे कारण कळले की, डॉक्टर त्यावर उपचार करण्याचे मार्ग सुचवू शकतात आणि दीर्घकालीन आराम देऊ शकतात. यात लक्षणांच्या तीव्रतेनुसार शारीरिक उपचार, औषधोपचार, मानसोपचार किंवा काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया देखील समाविष्ट असू शकतात.

व्‍हर्टिगोचे उत्तमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी व्‍यक्‍तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे, तसेच त्यांच्या औषधांच्या वेळापत्रकांचे पालन केले पाहिजे, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या जीवनमानामध्‍ये सुधारणा होऊ शकेल.

व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍या प्रियजनांनी अचानक स्थिती उद्भवण्‍यास कारणीभूत घटक ओळखणे आणि शारीरिक किंवा मानेच्‍या विशिष्‍ट हालचाली टाळण्‍यासारखे जीवनशैलीत बदल करून त्यांचे निराकरण करणे देखील उपयुक्त ठरू शकते.

यंदा १५ एप्रिल रोजी साजरा केला जाणाऱ्या वर्ल्‍ड वेस्टिब्युलर डिसीज अवेअरनेस डे निमित्त व्हर्टिगोची लक्षणे, त्याचा व्‍यक्‍तींचा जीवनावर होणारा परिणाम व त्‍याचे व्‍यवस्‍थापन करण्‍याचे मार्ग यांबाबत जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. व्हर्टिगोच्या लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात, ज्‍यामुळे तुम्‍ही कोणत्‍याही चिंतेशिवाय तुमच्‍या आवडत्‍या गोष्‍टी करण्‍याचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.