लठ्ठपणा कमी करण्यासाठी असो किंवा स्नायूंना बळकट करण्यासाठी आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवणे फार महत्वाचे आहे. बरेचदा लोक त्यांचे शरीर बिल्डअप करण्यासाठी किंवा निरोगी मार्गाने वजन कमी करण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रोटीन इनटेकवर विशेष लक्ष देतात. यासाठी ते अनेक प्रकारच्या प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थांना त्यांच्या आहाराचा भाग बनवतात.
आहारात प्रोटीन घेण्याचा विचार येतो तेव्हा अंडी आणि पनीर हे दोन पदार्थ आठवतात. प्रथिनांच्या व्यतिरिक्त, इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील त्यात आढळतात. बहुतेक लोक संभ्रमात राहतात की त्यांनी अंडे की पनीर यापैकी काय खावे? जेणेकरून त्यांना अधिक प्रथिने मिळतील. तुमच्याही मनात असाच प्रश्न असेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
अंड्यामध्ये अमीनो ॲसिड असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की एका मोठ्या अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रोटीन असते. प्रथिनांच्या व्यतिरिक्त अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई, बी12 आणि लोह सारखी खनिजे देखील असतात. अंड्याचे सेवन केल्याने नसाही मजबूत होतात. या कारणास्तव जे लोक व्यायाम करतात आणि जिममध्ये जातात, त्यांच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. अंडी खाल्ल्याने शरीराला दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळते. अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण तुलनेने जास्त असते, ज्यामुळे काही लोकांसाठी समस्या उद्भवू शकतात.
पनीरमध्ये सर्व आवश्यक अमीनो ॲसिड असतात. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रथिने असतात, जे अंड्यांपेक्षा जास्त असते. एवढेच नाही तर पनीर हा कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो हाडांसाठी महत्त्वाचा आहे. पनीरमध्ये अंड्यांपेक्षा कमी कोलेस्टेरॉल असते, परंतु पनीर अंड्यांपेक्षा पचण्यास कठीण असते, विशेषत: लॅक्टोज इनटॉलरेंस लोकांसाठी. इतकंच नाही तर पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळून येतं. ज्यामुळे हृदयरोग्यांना हानी पोहोचते.
आता प्रश्न पडतो की अंडी आणि पनीर यापैकी काय खावे. हे पूर्णपणे तुमच्या फूड चॉइसवर अवलंबून असते. अंड्यांपेक्षा पनीरमध्ये प्रति 100 ग्रॅम प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला कमी कोलेस्ट्रॉलसह प्रोटीनचे प्रमाण जास्त हवे असेल तर पनीर हा एक चांगला पर्याय असू शकतो.