डॉ. मालविका तांबे
गेले काही दिवस भारतात ऊन, पाऊस व थंडी यांचा लपंडाव चालला होता. आपण नेमक्या कुठल्या ऋतूत आहोत हे शरीराला कळेनासे झालेले होते. गेले आठवडाभर मात्र थंडीचा ऋतू सुरू झाला आहे याची जाणीव व्हायला लागली आहे. हिवाळा हा ऋतू सर्व ऋतूंमध्ये श्रेष्ठ आहे. उन्हाळ्यात उकाड्याने जीव घाबरतो. पावसाळ्यात सगळीकडे ओलावा असतो, फारसे बाहेर पडता येत नाही. हिवाळा मात्र आनंद घेण्यासारखा ऋतू असतो.