World Hemophilia Day : हिमोफिलायाग्रस्तांसाठी प्रत्येक जिल्ह्यात हवे ‘डे केअर सेंटर’!

राज्यात नऊ केंद्रे दुर्गम भागातील रुग्णांची मात्र भटकंती
Every district needs aday care center hemophilia sufferers
Every district needs aday care center hemophilia suffererssakal
Updated on

नागपूर : जखम झाल्यानंतर तीन मिनिटात रक्तस्राव थांबणे अपेक्षित आहे. परंतु रक्तस्राव थांबत नसल्यास अशा आजाराला हिमोफिलिया म्हणतात. १० हजारात एक हिमोफिलायाबाधित आढळतो. या आजारावर उपचारच अस्तित्वात नाहीत. मात्र, ज्या रक्तघटकांच्या कमतरतेमुळे होतो तो रक्तघटक इंजेक्शनद्वारे रुग्णाच्या शरीरात टोचणे हाच एकमेव पर्याय आहे.

मात्र या आजाराची चाचणी आणि उपचार केंद्रांची संख्या अल्प आहे. प्रत्येक जिल्ह्यात हिमॅटोलॉजीचे सेंटर उभारल्यास बाधितांचे जगणे काहीसे सुकर होईल. नागपुरात डागा रुग्णालयात हिमॅटोलॉजी सेंटर असून ४५० हिमोफेलियाबाधित उपचार घेत आहेत.

Every district needs aday care center hemophilia sufferers
Helath : योग- जीवन : अनारोग्याची कारणे

हिमोफिलियावरील उपचार अतिशय महागडे आहेत. त्यातच उपराजधानीत मेयो, मेडिकलमध्ये या रुग्णांवर उपचाराची सोय नाही. पूर्वी थेट मुंबई पुण्याला रेफर केले जात होते. आनुवंशिक रक्तदोषाच्या हिमोफिलियावर उपचारासाठी चार वर्षांपूर्वी डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात केंद्र तयार करण्यात आले.

डागासह मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सातारा, पुणे, धुळे, नगर, अमरावती, औरंगाबाद अशी ९ केंद्र आहेत. गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येथे येणे शक्य नाही. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात हिमोफिलिया उपचार केंद्र किंवा डे केअर सेंटरची गरज, रुग्ण आणि वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.

हिमोफिलियाबाबत...

जखमेतून रक्तस्राव होत असताना तो थांबवण्यासाठी उपाय करूनही तो थांबत नसल्यास या आजाराला हिमोफिलिया संबोधतात. मांसपेशीत वाहते रक्त शिरले तर हातपाय वाकडे होण्याची शक्यता असते. ‘क्‍लॉटिंग फॅक्‍टर’ नावाची तेरा विविध प्रथिने मिळून रक्त गोठविण्याचे काम करतात. हिमोफिलिया मात्र रक्त गोठवू देत नाही.

हा आनुवंशिक आजार आहे. या आजाराने बाधितांमध्ये ‘क्‍लॉटिंग फॅक्‍टर’ अजिबात नसतो किंवा कमी असतो. ते रक्ताच्या गुठळ्या बनवू शकत नाहीत. तो संसर्गाने होत नाही. तो आनुवंशिक असून दहा हजारमध्ये एक रुग्ण आढळतो.

Every district needs aday care center hemophilia sufferers
Health Tips : स्वयंपाक घरातील या वस्तुंपासुन मिळेल प्रत्येक दुखण्यावर आराम

हिमोफिलिया या असाध्य रोगाविषयी समाजात जागृती होणे आवश्‍यक आहे. यावर जनजागृतसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. डागा रुग्णालयात हिमोफिलिया ग्रस्तांसाठी आवश्यक सोय आहे. सुमारे ४५० हिमोफेलियाबाधितांची नोंद नागपुरात आहे. अशा रुग्णांच्या हितासाठीच हे केंद्र काम करते.

-डॉ. संजय देशमुख, केंद्र प्रमुख, हिमॅटोलॉजी डे केअर सेंटर, डागा रुग्णालय, नागपूर.

आजाराचे दुष्परिणाम

  • गुडघे, कोपर आणि टाचेमध्ये सूज येऊन दुखणे

  • सांध्यातून रक्त वाहणे

  • त्वचेच्या खाली रक्त जमा होणे

  • दात काढल्यानंतरही रक्त न थांबणे

  • नाकातून वारंवार रक्त वाहणे

  • लघवी किंवा शौचाच्या वेळी रक्त येणे

  • मेंदूच्या आत रक्त स्रवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()