जमेल तेव्हा व्यायाम करा

माझ्या मानसिक आरोग्यासाठी मी खास करून सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी सोशल मीडियापासून दूर राहते. त्यामुळे मला माझ्या दिवसाची सुरुवात आणि अखेर स्वच्छ मनाने करता येते.
actress adrija roy Exercise
actress adrija roy Exercisesakal
Updated on

- अद्रिजा रॉय, अभिनेत्री

मी राष्ट्रीय स्तरावरील धावपटू असून, आता शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी मी माझ्या रुटिनमध्ये नृत्य, चालणे आणि जिममध्ये व्यायाम करणे अशा गोष्टींचा समावेश करते. गोष्टी रोचक आणि प्रभावी राहाव्यात यासाठी वैविध्यपूर्णतेच्या ताकदीमध्ये माझा विश्वास आहे.

माझ्या मानसिक आरोग्यासाठी मी खास करून सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी सोशल मीडियापासून दूर राहते. त्यामुळे मला माझ्या दिवसाची सुरुवात आणि अखेर स्वच्छ मनाने करता येते. रोज कृतज्ञतेचा सराव केल्याने मला सकारात्मक राहता येते आणि माझे पाय जमिनीवरच ठेवता येतात. त्यामुळे आयुष्यातील चांगल्या गोष्टींची मी प्रशंसा आणि तणावाचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकते.

मी माझ्या वेळापत्रकानुसार जमेल तेव्हा जिमला जाते. धावण्याच्या माझ्या पार्श्वभूमीमुळे माझ्यामध्ये शिस्त आणि तंदुरुस्त राहण्याप्रती समर्पण या गोष्टी अंगी बाणवल्या गेलेल्या आहेत. मी सध्या झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’ या मालिकेमध्ये पाल्कीची प्रमुख भूमिका साकारत आहे. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे व्यायामामध्ये नियमित राहणे थोडे आव्हानात्मक होते; पण तरीही मी योग्य गोष्टींना प्राधान्य देते.

जिममध्ये माझ्या शरीरातील सर्व स्नायूंना व्यायाम मिळेल अशा प्रकारचे वर्कआउट करण्याचे ध्येय राखते. मला जिमला जायला जमत नाही, तेव्हा घरी किंवा व्हॅनिटीमध्ये किंवा मेकअप रूममध्ये माझ्या शरीराला सक्रिय राखण्यासाठी स्ट्रेचिंग आणि हलकाफुलका व्यायाम करते. मी कुठेही असले तरी सक्रिय राहणे गरजेचे आहे.

माझी योगाचीसुद्धा पार्श्वभूमी आहे आणि मी आजही माझ्या दैनंदिन व्यायामामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि खास करून अनुलोम विलोम यांचा समावेश करते. त्यामुळे मला शांत राहण्यास आणि माझे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. मी ध्यानही करते, मग दिवसभरात ते अगदी काही मिनिटांसाठी का असेना.

या सगळ्या सरावामुळे मला माझ्या व्यग्र वेळापत्रकाच्या तणावाचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येते आणि माझे ध्यान केंद्रित राहते. योगा आणि प्राणायाम ही माझ्या शरीर आणि मनाला संतुलित राखण्यासाठीची अमूल्य साधने आहेत.

चित्रीकरणाच्या दिवसांमध्ये मी दिवसभरात पाच ते सहा आहारांसह सुनियोजित आहार वेळापत्रकाचे पालन करते. दर काही तासांनी खाल्ल्यामुळे माझ्या ऊर्जेचा स्तर स्थिर राहतो. माझ्या आहारामध्ये फळे, भाज्या, प्रथिने आणि धान्यांचा समावेश असतो. मी घरी बनवलेले जेवण जेवण्यास प्रथम पसंती देते आणि प्रक्रिया केलेले व तेलकट पदार्थ टाळते. संतुलित आहारामध्ये माझा विश्वास असून, त्यामुळे माझ्या सक्रिय जीवनशैलीला आधार मिळतो आणि मला सर्वोत्तम वाटते.

सुदृढ आरोग्यासाठी टीप्स

  • नैसर्गिक, घरी बनवलेल्या जेवणाला पसंती द्या.

  • अतितेलकट आणि तळलेले पदार्थ तसेच रिफाईंड साखर टाळल्याने तुमच्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते.

  • कधी कधी तुमचे आवडते पदार्थ खाणे ठीक आहे; पण तेही बेतातच.

  • भरपूर पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या. या दोन्ही गोष्टी एकूणच आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचा अंतर्भाव करा आणि आराम करण्यासाठी व तणाव घालवण्यासाठी मुद्दाम वेळ बाजूला काढा.

  • चांगली जीवनशैली राखण्यासाठी चांगल्या सर्व सवयींमध्ये सातत्य महत्त्वाचे आहे. एक खेळाडू म्हणून माझ्या अनुभवामधून मी ते शिकले आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.