Indian Men Sperm Count: भारतीय पुरुषांमध्ये कमी होतोय स्पर्म काउंट; रिपोर्टचा धक्कादायक खुलासा...

२०११ ते २०१८ दरम्यान केलेल्या या अभ्यासामध्ये पुरुषांबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जाणून घेऊया सविस्तर
Indian Men Sperm Count
Indian Men Sperm Countesakal
Updated on

Health: भारतासह जगभऱ्यातील पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होत असल्याचे दिसून आले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या सात वर्षांच्या रिसर्चनंतर हा दावा केलाय. हा रिसर्च ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. २०११ ते २०१८ दरम्यान केलेल्या या अभ्यासामध्ये पुरुषांबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जाणून घेऊया सविस्तर.

पुरुषांबाबत हा अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेलाय. अनेक शास्त्रज्ञांचा या समावेश होता. ५३ देशांमध्ये सत्तावन्न हजार पुरुषांच्या स्पर्मचे नमूने घेण्यात आले. यात दक्षिण अमेरिका, एशिया आणि आफ्रिका या देशांचा समावेश होता.

Indian Men Sperm Count
Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

काय आहे स्टडी?

स्पर्म काउंट फक्त प्रोडक्शन पावरवरच नाही तर पुरुषांच्या आरोग्यावरही परिणाम करते. स्पर्म काउंट कमी झाल्यास टेस्टिकुलर कँसरसह अनेक आजारांना आमंत्रण देते. तसेच पुरुषांच्या सर्वांगिण विकासावरही याचा प्रभाव दिसून येतो.

Indian Men Sperm Count
Men Attracts Women: हे पुरुष महिलांना करतात आकर्षित; जाणून घ्या कारण

शास्त्रज्ञांनीही व्यक्त केली चिंता

रिसर्चमध्ये सहभागी झालेले हिब्रू युनिवर्सिटीचे प्रोफेसर म्हणाले भारतीय पुरुषांचा स्पर्म काउंट चिंताजनक आहे. अयोग्य जीवनशैली आणि वातावरणात असलेले केमिकल्स यामागचं महत्वाचं कारण असल्याचंही ते म्हणाले. मागल्या ४६ वर्षांत स्पर्म काउंटमध्ये ५० टक्के घट झालीय.

Indian Men Sperm Count
Health: हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे!

स्पर्म काउंट मनुष्याच्या अस्तित्वासाठीही धोकादायक

स्पर्म काउंट कमी झाल्यास आपोआप प्रजनन क्षमता कमी होते. त्यामुळे वातावरणातील स्पर्म काउंट कमी होण्यास कारक घटकांना नष्ट करायला हवं. स्टडीमध्ये दरवर्षी स्पर्म काउंट 1.2 टक्क्यांनी कमी होत असल्याचे दिसून येते. या समस्येवर लवकर तोडगा काढला नाही तर मानवी जीवन संपुष्टात येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.