Eye Care : हल्ली लोक झोपेतून उठताच मोबाईलची स्क्रिन स्क्रोल करायला लागतात. शिवाय ऑफिसमध्येही ८-१० स्क्रिनपुढे असतात. अशात तुमच्या डोळ्यांकडे तुमचे पूर्णत: दूर्लक्ष होते. परिणामी तुम्हाला डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. जास्त वेळ स्क्रिनकडे बघितल्यामुळे आय स्ट्रेनची समस्या उद्भवते.
तुम्ही तासंतास मोबाईल-लॅपटॉपच्या स्क्रिनकडे बघत असल्यास डोळ्यांचे दुखणे, डोकेदुखी आणि डोळे कोरडे पडणे यांसारख्या समस्या जाणवतात. ही सगळी लक्षणे आय स्ट्रेनमुळे दिसून येतात. या समस्येतून मुक्ती हवी असेल तर या काही टिप्स फॉलो करायला हव्यात.
डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी मोबाईल-लॅपटॉपच्या स्क्रिनवर काम करताना दर २० मिनिटांनी स्क्रिनपासून दूरच्या वस्तूंकडे २० सेकंद बघा. डोळ्यांना आराम मिळेल.
जर तुम्ही कामामुळे तासंतास मोबाईल-लॅपटॉपकडे बघत असाल तर त्याचा तुमच्या डोळ्यावर परिणाम होईल. स्क्रिन टाइम कमी करण्याकडे भर द्यावा. शिवाय तुमच्या डिव्हाइसची ब्राइटनेस कमी ठेवा.
मोबाईल-लॅपटॉप अंधारात बसून वापरू नका. डिव्हाइसमधून निघणारी ब्लू लाइट डोळ्यासाठी घातक असते. अशा वेळी चष्मा लावूनच मोबाईलकडे बघा.
ज्याप्रमाणे फिजीकली फिट राहण्यासाठी शरीराला व्यायामाची गरज असते त्याप्रमाणे डोळ्यांनाही व्यायामाची गरज असते. ज्यामुळे डोळ्यांवरील स्ट्रेस आणि थकवा कमी होते आणि दृष्टी चांगली राहते. (Health)
काही पदार्थ डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे पदार्थ डोळ्यांसाठी औषधाप्रमाणे कार्य करतात. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार फार महत्वाचा असतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.