EYE CARE डोळ्यांपासून किती दूर पकडावा मोबाईल...घ्या जाणून

मोबाईलचा वापर करताना तो डोळ्यांपासून योग्य अंतरावर पडकल्यास डोळ्यांसाठी तसंच दृष्टीसाठी धोका कमी होऊ शकतो. यासाठी मोबाईल आणि डोळ्यांमध्ये किती अंतर असावं हे जाणून घेणं गरजेचं आहे
डोळ्यांपासून किती दूर धरावा मोबाईल
डोळ्यांपासून किती दूर धरावा मोबाईलEsakal
Updated on

मोबाईल Mobile ही सध्या प्रत्येकासाठीच महत्वाची गोष्ट ठरतेय. केवळ संपर्क साधण्याचं साधन म्हणून नव्हे तर मनोरंजनासाठी Entertainment किंवा विरंगुळा म्हणून मोबाईलला प्राधान्य दिलं जातं आहे. Eye Care Tips in Marathi How away you should hold your mobile from sight

गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा Social Mediaअतिवापर आणि एकूणच मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक मानसिक समस्या Mental Problems निर्माण होत असल्याचं संशोधनामध्ये समोर आलं आहे. केवळ मानसिकच नव्हे तर मोबाईलच्या Mobile अतिवापरामुळे शारिरीक स्वास्थ देखील बिघडू लागलं आहे.

केवळ तरुण पिढीच नव्हे तर लहान मुलं, गृहिणी आणि सर्वच वयोगटातील लोक मोबाईलचा तासनतास वापर करू लागले आहेत. मोबाईलवर सोशल मीडियाचा वापर करणं, सिनेमा किंवा वेब सीरिज पाहणं, गेम खेळणं यासाठी तासनतास मोबाईल पाहिल्याने त्याचा डोळ्यांवरही विपरीत परिणाम होत आहे.

खरं तर मोबाईल हा डोळ्यांसाठी घातक आहे हे माहित असूनही अनेकजण मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात करत आहेत. अनेकदा लहान मुलं किंवा काही तरुणही मोबाईल अत्यंत जवळून पाहत असल्याचं आढळून आलं असेल.

मोबाईलचा वापर करताना तो डोळ्यांपासून योग्य अंतरावर पडकल्यास डोळ्यांसाठी तसंच दृष्टीसाठी धोका कमी होऊ शकतो. यासाठी मोबाईल आणि डोळ्यांमध्ये किती अंतर असावं हे जाणून घेणं गरजेचं आहे. 

हे देखिल वाचा-

डोळ्यांपासून किती दूर धरावा मोबाईल
Daam Virus : सावधान! थेट कॉल लॉग आणि कॅमेरा हॅक करतोय हा व्हायरस, केंद्रीय यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा

अनेक तास मोबाईलमध्ये पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊन डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे थकवा. डोळे कोरडे होणं किंवा डोळ्यांची जळजळ, धुसर दिसणं अशा समस्या निर्माण होतात. अनेक युजर्स स्मार्टफोन वापरत असताना तो चेहऱ्यापासून जवळपास ८ इंच अंतरावर पकडतात. डोळ्यांसाठी हे अत्यंत हानिकारक आहे. 

तज्ञांच्या मते स्मार्टफोनमधून निघणारा उजेड हा डोळ्यांसाठी तसचं रेटिनासाठी अत्यंत धोकादायक आहे. यासाठीच जर तुम्ही जास्त वेळ मोबाईलचा वापर करत असाल तर डोळ्यांचं नुकसान कमी व्हावं यासाठी मोबाईल डोळ्यांपासून किमान १६ ते १८ इंच दूर असणं गरजेंचं आहे. 

मोबाईलचा वापर करताना ही काळजी घ्या

  • जर तुम्ही जास्त वेळ मोबाईलचा वापर करत असाल तर काही मिनिटांनी अधुन मधून डोळ्यांच्या पापण्यांची उघड-झाप करा. यामुळे डोळे कोरडे होणार नाहीत आणि डोळ्यांची जळजळ होणार नाही. 

  • १५ मिनिटांमध्ये किमान १० वेळा तरी पापण्यांची उघड-झाप होणं गरजेचं आहे. 

  • मोबाईलचा वापर करत असताना २०-२०-२० या एका मेथडचं पालन करा. म्हणजेच दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी किमान स्क्रिनपासून २० इंच दूर असलेल्या वस्तूकडे पहा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल. 

  • मोबाईलचा वापर करताना स्क्रिनच्या ब्राइटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही बसलेल्या ठिकाणी असलेल्या उजेडा समान किंवा तेवढाच ब्राइटनेस असणं गरजेचं आहे. 

  • अंधारामध्ये किंवा रात्री लाइट बंद केल्यावर मोबाईलचा वापर करणं डोळ्यांसाठी जास्त धोकादायक ठरू शकतं. यासाठी अंधारात मोबाईलचा वापर टाळा. अथवा गरज असल्यास मोबाईल वापरताना ब्राईटनेस अगदी कमी ठेवा. 

  • मोबाईलमध्ये देण्यात आलेला डार्क मोडचा पर्याय डोळ्यांसाठी चांगला असला तरी सतत डार्कमोडवर मोबाईल वापरणं डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकत. यासाठी वेळोवेळी डार्कमोड आणि लाईटमोड बदलत रहा. 

अशा प्रकारे डोळ्यांची काळजी घ्यायची असेल तर मोबाईल डोळ्यांपासून दूर पकडणं जास्त गरजेचं आहे. शिवाय मोबाईल्या वापरावर शक्य तेवढं नियंत्रण ठेवणं हे कधीही अधिक योग्य ठरेल.

हे देखिल वाचा-

डोळ्यांपासून किती दूर धरावा मोबाईल
Mobile Side Effects : स्मार्टफोन देण्यासाठी मुलाचं योग्य वय किती असावं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.