Eye Infection : भारतीय औषधांमुळे डोळ्यात संसर्ग; श्रीलंकेचा आरोप; गुजरातच्या औषध कंपनीची तपासणी

मिथाईल प्रेडनिसोलोन आय ड्रॉपचा वापर केल्यानंतर रुग्णांच्या डोळ्यात संसर्ग
Eye infection due to Indian medicines Sri Lanka charges Inspection of Pharmaceutical Company of Gujarat
Eye infection due to Indian medicines Sri Lanka charges Inspection of Pharmaceutical Company of Gujaratsakal
Updated on

नवी दिल्ली/कोलंबो : भारतातून आयात केलेल्या डोळ्यांच्या औषधाच्या वापरामुळे सुमारे ३५ रुग्णांच्या डोळ्यात संसर्ग झाल्याची तक्रार अलिकडेच श्रीलंकेने केली आहे. या तक्रारीनंतर भारतात तयार झालेल्या औषधाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) च्या सूत्रानुसार, श्रीलंकेकडून तक्रार आल्यानंतर गुजरातमधील औषध कंपनीची तपासणी केली जात आहे. मिथाईल प्रेडनिसोलोन आय ड्रॉपचा वापर केल्यानंतर रुग्णांच्या डोळ्यात संसर्ग वाढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Eye infection due to Indian medicines Sri Lanka charges Inspection of Pharmaceutical Company of Gujarat
Medical Colleges: मोदी सरकारचा विद्यार्थ्यांना मोठा धक्का! देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द

याच वर्षी मार्च महिन्यात आयड्रॉपचे दोन मोठे खेप श्रीलंकेला निर्यात करण्यात आले होते. मात्र एप्रिल महिन्यांत तेथील तीन मोठ्या रुग्णालयात ३० ते ३५ जणांच्या डोळ्यात संसर्ग झाल्याची तक्रार मिळाली. यानंतर श्रीलंका सरकारने या औषधावर बंदी घातली या तक्रारीची दखल घेत गुजरातच्या कंपनीने श्रीलंकेला पाठवलेले औषधे परत मागवले आहेत.

Eye infection due to Indian medicines Sri Lanka charges Inspection of Pharmaceutical Company of Gujarat
Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल लागला! 'येथे' पाहा संपूर्ण माहिती

याप्रकरणी श्रीलंका सरकारने पत्र लिहून भारताला या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांनी औषध उद्योगात गुणवत्तेत तडजोड केल्यास देशासाठी ती बाब चांगली राहणार नाही व ते सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.