Fairness Cream Side Effect : महिलांना त्यांच्या चेहऱ्याच्या त्वचेची सगळ्यात जास्त काळजी असते. आणि म्हणून महिला चमकदार त्वचेसाठी मिळेल तो उपाय ट्राय करत असतात. फेअरनेस क्रीम वापरणे, फेशिअल करणे अशा बऱ्याच गोष्टी महिला करत असतात. मात्र गोरं दिसण्याच्या नादात तुम्ही वापरत असलेली फेअरनेस क्रीम तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी किती जीवघेणी ठरू शकते याची कल्पना तुम्हाला आहे काय? फेअरनेस क्रीमचे साइड इफेक्ट्स वाचून तुम्हाला धक्काच बसेल.
महिलेसोबत घडले असे काही की...
एका विशीतल्या तरुणीनं स्थानिक कंपनीचं फेअरनेस क्रीम वापरायला सुरुवात केली. तिच्या चेह-यावर ग्लो आला. आणि लोक तिचं कौतुक करु लागले. मग तिच्या आई आणि बहिणीनंही तेच फेअरनेस क्रीम वापरायला सुरुवात केली आणि पुढे असा धक्कादायक प्रकार घडला की ऐकणारेही चकीत झाले.
झाला हा आजार
फेअरनेस क्रीम वापरल्यानंतर काही महिन्यात वापरणाऱ्यांना तिघींनाही ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा आजार झाला. या आजारात किडनीतील लहान फिल्टर खराब होतात.
एकाच घरातील तिघींनाही हा आजार कसा काय झाला यावर केईएम रुग्णालयात अभ्यास करण्यात आला आणि संशयाची सुई फेअरनेस क्रीमकडे वळली. या फेअरनेस क्रीममध्ये (Cosmetic Product) पाऱ्याची पातळी 1 पीपीएम म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात होती.
सामान्य माणसाच्या शरीरात रक्ताची पातळी 7 एवढी असते. पण फेअरनेस क्रीम वापरणाऱ्या तरुणीच्या रक्तात पाऱ्याची पातळी चक्क 46 होती.त्यामुळे कुठलंही फेअरनेस क्रीम वापरताना आधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
अकोल्यातल्या त्या तरुणीच्या आई-बहिणीचा आजार बरा झालाय. पण ती तरुणी अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. (Health) पारा (Mercury) मानवी शरिरासाठी विषारी असतो. तरीही फेअरनेस आणि ब्युटी क्रीममध्ये पा-यासारखे धातू सर्रास वापरले जातात. त्यामुळे वेळीच धडा घ्या. आणि तुम्ही वापरताय त्या फेअरनेस क्रीममध्ये नेमके काय घटक आहेत, याची शंभर वेळा खात्री करुन घ्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.