Fake Butter: लहान मुलांना ब्रेड-बटर खायला देताय? तर थांबा, व्हायरल व्हिडिओचं सत्य पाहा

Viral Video On Fake Butter : प्रत्येक घरात अनेक पदार्थ बनवण्यासाठी बटरचा वापर करतात. पण तुम्ही बचर खाऊन आजारी पडू शकता. कारण बाजारात नकली बटर विक्रीला आल्याचा दावा केला जात आहे.
Fake Butter
Fake ButterSakal
Updated on

Fake Butter: अनेक लोक ब्रेडसोबत बटर खातात. घरातील लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांना बटर खायला आवडते. प्रत्येक घरात अनेक पदार्थ बनवण्यासाठी बटरचा वापर करतात. अनेक घरांमध्ये चपाती आणि ब्रेडसोबत बटर खाल्ले जाते. अनेक महिला देखील लहान मुलांना बटर ब्रेड टिफीनमध्ये देतात. पण तुम्ही बचर खाऊन आजारी पडू शकता. कारण बाजारात नकली बटर विक्रीला आल्याचा दावा केला जात आहे. साम वृत्तवाहिनीने याची पडताळणी केली आहे. या पडताळणीत काय समोर आले हे जाणून घेऊया.

Fake Butter
Viral Video: जेजे हॉस्पिटलमध्ये खरंच हार्ट अ‍टॅकवर फक्त ५ हजारात उपचार ? व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं समोर

व्हायरल मॅसेजमध्ये करण्यात आलेले दावा

तुम्ही वापरत असलेले बटर नकली असू शकते. आजकाल बाजारात भेसळयुक्त बटर उपलब्ध आहे. नकली बटर आपण ओळखूही शकत नाही. मात्र नकली बटर खाल्यास लिव्हर, किडनी हार्टवर गंभीर पिरणाम होऊ शकतो.

काय आहे व्हायरल व्हिडिओमगचे सत्य

नकली बटर तयार करण्यासाठी कृत्रिम फॅट्स आयोडीन आणि स्टार्च वापरले जाते. कृत्रिम फॅट्स उत्पादनासाठी स्वस्त असते. आयोडीनचा अति वापर करणे आरोग्यासाठी घातक असते. स्टार्चमुळे वजन वाढू शकते. यामुळे नकली बटर कसे ओळखाचे हे जाणून घेऊया.

नकली बटर कसे ओळखायचे?

दोन काचेच्या ग्लासमध्ये पाणी टाका.

अर्धा चमचा दोन्ही ग्लासमध्ये बटर टाका.

बटर टाकलेल्या दोन्ही ग्लासमध्ये आयोडीन सोलूशन टाका.

आयोडीन सोलूशन हे मेडिकलमध्ये मिळते.

आयोडीन सोलूशन टाकल्यानंतर नकली बटरचा रंग निळा होतो.

डॉ. गौरव बच्छाव , डीएम गॅस्टोजेनिक यांनी सांगितले की, नकली बटर खाल्यास शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. तसेच बटरचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणा वाढते आणि लिव्हर किडनीला धोका निर्माण होतो. नकली बटर पोटात गेल्यास मधुमेह, हृदयविकारासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतो. बटरचे अतिसेवन केल्यास शरीरातील लठ्ठपणा वाढू शकतो.

बाजारात अनेक ब्रँडचे बटर मिळतात. पण काही लोक ब्रँडच्या नावाचा वापर करून नकली बटर बनवतात. साम वृत्तवाहिनीने केलेली पडताळणी खरी ठरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.